पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध | pustakache manogat essay in Marathi

jivmarathi.blogspot.com


पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध
 किंवा 
पुस्तक बोलु लागले तर

        रविवारचा दिवस होता .मला वाचनाची आवड असल्यामुळे मी वाचण्यासाठी एक पुस्तक घेतले. माझ्याकडे भरपूर पुस्तके आहेत. त्यातील एक गोष्टींचे पुस्तक मी बऱ्याच वर्षांपूर्वी विकत घेतले होते. आता मात्र मी ते पुस्तक काही वाचत नाही. जेव्हा ते विकत घेतले होते तेव्हा माझे सर्वात आवडते पुस्तक ते होते त्या पुस्तकातील ज्या गोष्टी होत्या त्यामधील राक्षस ,राजा, राणी ,शूर शिपाई हे सगळे म्हणजे माझे पक्के मित्र होते.
     

     दुपारची वेळ असल्यामुळे शांत वातावरण होते. मी पुस्तक वाचण्यात मग्न होतो. बिप्या टेबलावर असलेल्या पुस्तकाची पाने आणि जोर जोराने फडफडू लागली. मी पुस्तक उचलण्यासाठी हात पुढे केला तितक्यात आवाज आला ,"थांब , मला तुझा राग आलेला आहे."मी घाबरलोच त्यात पुन्हा आवाज आला रे काय घाबरतोस मी पुस्तक बोलत आहे.
         किती तरी दिवस झाले माझ्याकडे पाठ फिरवलेली आहेस. आपण एकत्रितपणे किती आनंदाने दिवस घालवले हे विसरलास. पुस्तक बोलत असतानाच अचानक कपाटाचा जोरात आवाज आला आणि मी घाबरलो . कपाटामधून एक उंच राक्षस बाहेर आला. राक्षसाला बघून तर माझी घाबरगुंडी उडाली. तेवढेच  तितक्यात त्या राक्षसाच्या मागून दुसरा एक बलवान माणूस बाहेर आला. त्यांना बघून पुस्तक बोलु लागले. अरे तुम्ही बाहेर कसे आलात चला माझ्या आत गप्प बसा.
      ते दोघेही पुस्तकातून बाहेर आलेले होते. पुस्तक बोलु लागले तू आमच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे आम्हालाही करमेनासे झाले होते. त्यामुळे ते  माझ्यातून बाहेर आलेले आहेत. मी पुस्तकाला सांगितले आता मी नेहमी तुझे वाचन करत जाईल तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही परंतु यांना तेवढं तुझ्या आत घे. असे म्हणताच तो राक्षस आणि दुसरा एक बलदंड मनुष्य पुस्तक आत शिरला.
     पुस्तक  बोलू लागले. तू बऱ्याच वर्षांपूर्वी मला विकत आणले होते. त्यावेळी आपली चांगलीच मैत्री जमली होती तू दिवसभर माझ्यातील चित्र बघत असायचा. माझे पान कुठे थोडे जरी वाटले तरी देखील लगेच चिकटवून माझी काळजी घ्यायचा.
        माझ्या मध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. कृष्णा, अर्जुन, भीम, ससा, कासव, राजकुमार ,राजकुमारी यांच्या कथा वाचून तुझ्यावर मूल्यसंस्कार घडवण्यामध्ये माझा देखील हातभार आहे.
         आज अनेक जण तुझं कौतुक करतात. एक चांगला मुलगा म्हणून तुझ्याकडे बघतात. यामध्ये माझा हातभार नक्कीच आहे. माझी तुला कळकळीची विनंती आहे की माझ्याकडे दुर्लक्ष करू नको मला दिवसातून एकदातरी भेट देत जा तुझी भेट झाली की मला खूपच छान वाटते आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण होते माझी एवढी विनंती तू नक्की ऐकशील अशी आशा करतो.
         एवढे बोलून पुस्तक शांत झाले आणि मीही पुस्तकाचे मनोगत शांतपणे ऐकून घेतल्यानंतर माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले.


        प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा मी लिहिलेला पुस्तकाचे मनोगत निबंध कसा वाटला . यालाच तुम्ही मी पुस्तक बोलतो आहे. असे देखील म्हणू शकता.
या निबंधाचा शोध लोक खालीलप्रमाणे घेतात.
पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
पुस्तकाचे आत्मवृत्त
पुस्तकाचे आत्मकथन
मी पुस्तक बोलतो आहे
पुस्तक बोलु लागले तर
पुस्तकाची आत्मकथा

तुम्हाला खालील निबंध देखील आवडतील.

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने