jivmarathi.blogspot.com
प्रिय मित्रांनो , तुमचा निबंध लेखनाचा अधिक सराव व्हावा म्हणून तुमच्यासाठी मी अजून एक निबंध घेऊन आलेलो आहे. या निबंधाचे नाव आहे | शेतीचे मनोगत याला तुम्ही | शेत बोलू लागले तर असे देखील म्हणू शकता.
हा निबंध तुम्ही वाचा आणि तुमच्या शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा .इथला निबंध जसाच्या तसा लिहू नका , तर तुमच्या शब्दात लिहा .म्हणजे तुम्हाला देखील निबंध लिहिण्याची कला प्राप्त होण्यामध्ये नक्कीच मदत मिळेल. चला तर मग बघुया एक छानसा निबंध |शेत बोलू लागले तर किंवा | शेतीचे मनोगत .
शेतीचे मनोगत
| शेत बोलू लागले तर
| शेताची आत्मकथा
माझ्या गावाचे नाव कुंदापूर आहे. येथील बरेच लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय .आमचेही शेत याच गावांमध्ये.आमचे शेत तसे गावापासून थोडे दूरच आहे. वडील जवळच्याच गावामध्ये नोकरी करतात .आजोबांचे वय भरपूर झालेले आहे. नोकरीला असल्यामुळे वडिलांना शेतीकडे लक्ष देणे फारसे जमत नाही आजोबा मात्र शेतीमध्ये मनापासून लक्ष देत असत, परंतु आता त्यांचे वय वाढल्यामुळे शेतीची कामे त्यांच्याकडून होत नाहीत. म्हणून सध्या तरी शेतीकडे आमचे दुर्लक्ष आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही.
दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या त्यामुळे वडीलही थोडेसे निवांत होते. एके दिवशी वडिलांना सांगितले, "पप्पा आपण आज आपल्या शेतामध्ये डबा घेऊन जेवायला जाऊया." वडील म्हटले ,"अरे, शेतामध्ये काही नाही. फक्त काटेरी झाडे उगवलेली आहेत. तिथे जाऊन काय करणार? पण मी हट्ट धरलेला होता .त्यामुळे वडील शेतामध्ये जाण्यासाठी तयार झाले.
शेतात पोहोचल्यावर पप्पांनी सांगितल्याप्रमाणेच सगळे चित्र दिसत होते. आजोबांचा चेहरा पडला होता कारण की याच शेतीमध्ये त्यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट केले होते . तिची अशी दुरावस्था बघून त्यांना वाईट वाटत होते.
डबे खाऊन झाल्यानंतर सगळ्यांनी एक स्वच्छ जागा बघून अंग टाकले. मी शेतात इकडे तिकडे भटकत जाण्याच्या तयारीत होतो आणि पप्पांना तसे सांगून शेताच्या बांधाने शेतामध्ये फिरू लागलो. फिरता फिरता अचानक माझ्या पायात काटा रुतला. एक तीव्र सनक माझ्या पायातून मेंदूपर्यंत गेली. कसातरी काटा काढला आणि मला शेताचा रागच आला . म्हणून" कशाला आलो या शेतामध्ये ?"असे उद्गार काढले.
असं बोलताच आवाज आला ,"आता तुही असे म्हणशील तर मग मी जावे कुठे? माझी सुधारणा होणार कशी? आणि माझी काळजी घेणार कोण?" "अरे बापरे, कोण बोललं?" असं म्हणून मी इकडे तिकडे बघू लागलो. पायाला काटा रूतल्यामुळे होणारी वेदना कुठल्या कुठे पळून गेली. मी पलायनाच्या तयारीत होतो, की तेवढ्यात पुन्हा आवाज आला. "थांब पळू नको. मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे. मला माझे मन तुझ्या जवळ मोकळे करायचे आहे."
मी आतून चांगलाच टरकलो होतो परंतु मोठे धाडस करून तिथे थांबलो आणि विचारले कोण बोलत आहे. मी शेत बोलत आहे असा आवाज आला. मला कानावर विश्वासच बसत नव्हता परंतु पुन्हा आवाज आला मी तुमचे हे शेतच बोलत आहे तू म्हणतोस कशाला आलोया शेतामध्ये अरे यात माझा काय दोष . तुला काटा रुतला कारण माझ्याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला वेळच नाही.
माझा तर स्वभावच आहे की शेतात उगवणाऱ्या प्रत्येक रोपट्याला जीवनदान देणे .आता कोणते रोप उगऊ द्यायचे आणि कोणते नाही हे तर तुमच्या हातात आहे . तुझे आजोबा जेव्हा शेतात यायचे त्यावेळी ते खूप कष्ट करत असत ,आणि मीही त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून भरपूर धान्य देत असे. तेव्हा या शेतामध्ये एकही काट्याचे झाड नव्हते.
तुला काटा टोचला कारण की शेतामध्ये काटे उगवलेले आहेत याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही माझी काळजी घ्या अशी माझी खूप इच्छा आहे. माझ्या हातात फक्त इच्छा व्यक्त करणे एवढी एकच गोष्ट आहे. माझी काळजी घ्यायची की नाही हे आता तुम्हीच ठरवा.
बऱ्याच दिवसांपासून माझे मनोगत व्यक्त करण्याची इच्छा होती परंतु या ठिकाणी कोणी येतच नव्हते म्हणून माझ्या इच्छा सांगता येत नव्हत्या, परंतु तुझ्या रूपाने मला माझ्या इच्छा जाणून घेणारा चांगला मित्र मिळाला. तू भविष्यातील पिढी आहेस त्यामुळे मी तुझ्याकडे माझे मन व्यक्त केले. तू तरी माझ्याकडे लक्ष देशील अशी अपेक्षा करतो. तू तुझ्या आजोबांकडे आणि पप्पांकडे जा ते तुझी वाट बघत आहेत.
एवढे बोलून शेत शांत झाले होते परंतु माझे मन मात्र अशांततेने भरून गेले होते. पप्पांकडे पोहोचल्यानंतर, मी पप्पांना सांगितले "पप्पा आपण शेती करूया किंवा कोणाला तरी करण्यासाठी देऊया म्हणजे आपली शेती चांगली राहील." पप्पानीही माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले व थोडा विचार करून आपण हे शेत करण्यासाठी देऊया असे सांगितल . अरे हे ऐकून मला खूपच छान वाटले तसे शेतालाही खूपच चांगले वाटले असेल यात काहीही शंका नाही.
हिरव्यागार पिकाने डोलत असलेले शेत मला दिसत होते. आनंदाने मी घराकडे निघालो काटा टोचल्याची वेदना आता जाणवत नव्हती .उलट मन उत्साहाने भरून गेले होते.
प्रिय मित्रांनो, तुम्हाला | शेत बोलू लागले तर किंवा | शेताचे मनोगत निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
हा निबंध लोक खालील नावानेही शोधतात.
- |शेत बोलू लागले तर मराठी निबंध
- |शेताची आत्मकथा मराठी निबंध
- |शेताचे आत्मकथन मराठी निबंध|shetache atmakathan
- |शेत बोलू लागते तेव्हा मराठी निबंध
- |शेतीचे मनोगत मराठी निबंध |shetache manogat
- |शेतीची कैफियत मराठी निबंध
- |शेताची कैफियत मराठी निबंध
तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल तर तेही कळवा ,म्हणजे मग मी तुम्हाला त्या पद्धतीने निबंध लिहून मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन.
खालील निबंध वाचायला अजिबात विसरू नका
- शेतीचे मनोगत | शेत बोलू लागले तर |shetiche manogat
- झाडाचे मनोगत |आत्मवृत्त मराठी निबंध , भाषण ,लेख |
- श्रावणातील पावसाची वशिष्ट्ये
- एका पुतळ्याचे मनोगत | eka putalyache manogat
- संगणकाचे मनोगत | sanganakache manogat
- उंदराचे मनोगत मराठी निबंध
- एका घराचे मनोगत मराठी निबंध
- निरोप समारंभाचे भाषण
- चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध |chahache manogat
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.