निरोप समारंभाचे भाषण

jivmarathi.blogspot.com


         निरोप हा शब्द तसा फारच छोटासा आहे. परंतु प्रत्येकाला या शब्दाचा सामना आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी करावाच लागतो. 
      निरोप समारंभाच्या प्रसंगी भाषण कसे करावे ?  यासाठी आपल्याला मदत मिळावी म्हणून छोटासा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी एक प्रसंग घेतलेला आहे व त्याला अनुसरून निरोप समारंभाचे भाषण आपल्या समोर आम्ही घेऊ आम्हाला जसे आवश्यक असेल त्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता.

प्रसंग एक

  शिक्षण विभागातील केंद्राच्या केंद्रप्रमुख निवृत्त होत आहेत त्यासाठी निरोप समारंभ घेण्यात येत आहे भाषण..


       नमस्कार, मी, कैलास घरटे. आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती सन्माननीय सौ....... तसेच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ........ , आदरणीय व्यासपीठ , उपस्थित प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजनवर्ग आणि सर्व उत्तमोत्तम शिक्षक सहकाऱ्यांना नमस्कार.
      आज आपण या ठिकाणी आपल्या केंद्राच्या अगदी आवडत्या केंद्रप्रमुख सौ......... यांच्या निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत.
        निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अध्यक्षांची निवड करणे हे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ....... यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो .
(अध्यक्ष निवडीला उपस्थितांपैकी कोणीतरी अनुमोदन द्यावे)
      
      अध्यक्ष निवड झाल्यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढील सतरा कडे वळूया त्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री....... यांना व उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती माता फोटो पूजनासाठी पुढे यावे व दिपप्रज्वलन करावे.

       
      
    कितीही सुखद असली, 
      तरी कुठेतरी संपणारी वाट असते|
 पण संपणाऱ्या वाटेबरोबरच,
        जन्मनारी नवी पहाट असते ||
   
तेव्हा आजचा हा निरोपाचा सोहळा म्हणजे आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची पहाट ठरावी अशा मनस्वी शुभेच्छा.
    सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते निरोप दिला म्हणजे नाते कधी तुटत नसते धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी आपला माणूस दूर गेला तरी प्रेम कधी आटत नसते.

निरोप समारंभ कार्यक्रमातील पायऱ्या
 1. सर्वांचे स्वागत
 2. अध्यक्ष निवड व अनुमोदन
 3. दीपप्रज्वलन व फोटो पूजन
 4. परत एकदा सर्वांचे शाब्दिक स्वागत
 5. उपस्थितांचे स्वागत काही वस्तू अथवा श्रीफळ देऊन
 6. सत्कार मूर्तींचे स्वागत
 7. मनोगत , आठवण कथन
 8. निरोपआर्थ व्यक्तीचे मनोगत
 9. अध्यक्षीय मनोगत
 10. आभार प्रदर्शन
 11. समारोप
 12.  भोजन
         हे लेखही नक्की वाचा 
 1. शेतीचे मनोगत | शेत बोलू लागले तर |shetiche manogat 
 2. झाडाचे मनोगत |आत्मवृत्त मराठी निबंध , भाषण ,लेख | 
 3. श्रावणातील पावसाची वशिष्ट्ये
 4. एका पुतळ्याचे मनोगत | eka putalyache manogat 
 5. संगणकाचे मनोगत | sanganakache manogat 
 6. उंदराचे मनोगत मराठी निबंध 
 7. एका घराचे मनोगत मराठी निबंध 
 8. निरोप समारंभाचे भाषण 
 9. चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध |chahache manogat

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने