उंदराचे मनोगत | उंदीर बोलू लागला तर मराठी निबंध |undir bolu lagla tr ,marathi essay

jivmarathi.blogspot.com




          नमस्कार मित्रांनो , मी उंदीर बोलत आहे. मी आकाराने जरी इतका लहान दिसत असलो तरी सुद्धा मोठ्या मोठ्यांची भंबेरी उडवून देतो. मला बघताच तर अनेक स्त्रियांची घाबरगुंडी उडून जाते. स्त्रियांमध्ये माझा फारच जबरदस्त दरारा आहे.
        माझा आकार लहान असला तरी सुद्धा मी अशक्य असणारे अनेक काम करून मोकळा होतो. तुम्ही कोणतेही धान्य किंवा महत्वाच्या वस्तू ठेवताना उंदीर त्याठिकाणी येऊ नये याची काळजी घेतात. बघितला माझा किती धाक आहे सगळ्यांना.
          बऱ्याचदा लहान मुले मात्र मला घाबरत नाही असे माझ्या निदर्शनात आलेले आहे. टुणटुण उड्या मारत मी घरभर फिरत असतो. शेतांमध्ये गेल्यावर मात्र साप काहीवेळा उंदरांना  पकडतो आणि गट्टम करतो. 
        माझ्या पूर्वजांचे गोष्ट तुम्ही ऐकली असेलच.
         एकदा माझे  पणजोबा जंगलात फिरत असताना, जंगलाचा राजा सिंह आराम करत होता. माझे पणजोबा सिंहाच्या अंगावर जाऊन उड्या मारू लागले. त्यांना अजिबात भीती वाटत नव्हती. ते उड्या मारणे मध्ये व्यस्त होते.
       तितक्यात अचानक सिंहाला जाग आली आणि त्याने माझ्या पणजोबांना पकडले. सिंह त्यांना खाणारच होता तितक्यात ते म्हणाले महाराज मला खाऊ नका मी छोटा असलो तरी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही एखाद्या अडचणीत असताना मी तुम्हाला नक्की मदत करेन.
        त्यांचे हे बोलणे ऐकून सिंह महाराजांना हसू आले. महाराजांना त्यांची दया आली व त्यांनी माझ्या पणजोबांना सोडून दिले. माझे पणजोबा सिंह महाराजांना धन्यवाद म्हणून तेथून निघून गेले.
       एक दिवस जंगलांमध्ये शिकारी आले. शिकाऱ्यांनी सिंह महाराजांना पकडण्यासाठी जंगलात जाळे लावले. सिंह महाराज जंगलामध्ये अडकले. त्यांनी जाळे तोडण्याचा फारच प्रयत्न केला, परंतु जाळे अगदी मजबूत होते . ते काही तुटत नव्हते.
      महाराज मोठमोठ्याने गर्जना करू लागले.  त्या गर्जना पणजोबांच्या कानावर पडल्या. ते धावत सिंह महाराजांच्य दिशेने गेले. महाराजांना जाळ्यामध्ये अडकलेले बघून महाराजांना त्यांनी विनंती केली ,"महाराज तुम्ही गर्जना करू नका ;तुमच्या आवाजाणे  शिकारी लवकरच येथे येतील. तुम्ही शांत राहा . मी तुम्हाला काही क्षणातच या जाळ्यातून मोकळ करतो."
        सिंह महाराज शांत झाले. उंदीर बाबांनी सर्व जाळे आपल्या तीक्ष्ण दातांनी कुरतडून काढले . काही वेळातच सिंह महाराज मोकळे झाले.
       राज खरच खुश झाले आणि त्यांनी पणजोबांना धन्यवाद दिले. याबरोबरच आज पासून तुम्ही अंगावर केव्हाही खेळू शकता असेही सांगितले. व्यक्ती लहान असो की मोठा परंतु तो कधीही आपल्याला उपयोगी ठरू शकतो, हे मला आजच या प्रसंगावरून कळले .असे सिंह महाराज म्हणाले.
        त्या दिवसापासून ते खूप चांगले मित्र झाले.

     प्रिय मित्रांनो, तुम्हाला हा |उंदीर बोलू लागला तर | किंवा |उंदराचे मनोगत |  निबंध कसा वाटला?  हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून कशाचे मनोगत हवे असेल तर तेही कळवा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.

तुम्हाला खालील निबंध वाचायला नक्की आवडतील.

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने