jivmarathi.blogspot.com
एक चांगला निबंध लिहिणे ही एक प्रकारची कला आहे आणि कोणतीही कला ही जोपासावी लागते. तरच त्यामध्ये आपल्याला कौशल्य प्राप्त होते. या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी झाडाचे मनोगत मराठी निबंध घेऊन आलेलो आहे. निबंध थोडा मोठा आहे परंतु यातील काही भाग तुम्ही तुमच्या विविध परीक्षांमध्ये वापरू शकतात.
एक मोलाचा सल्ला ;
हा निबंध तुम्ही वाचा परंतु तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या आतील निबंध लेखन केलेला चांगला वाव मिळेल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन आपण आयुष्याचा पर्वत सर करू शकत नाही. त्यामुळे स्वतःला त्या पद्धतीने समर्थ बनवा.. चला मग आता आपण बघुया एक छानसा निबंध | एका झाडाचे मनोगत ..
एका झाडाचे मनोगत
मराठी निबंध.
Eka Zadache Manogat
बर्याच दिवसांनी शेतात जाण्याचा प्रसंग आलेला होता शाळा चालू असल्या की शेतात जायला फार कमी वेळ मिळतो शाळा शिकवणी वर्ग यातून शेतात जाण्यासाठी वेळ मिळणे फारच कठीण होते. शेतात पोहोचल्यावर शेतातले हिरवळ बघून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. शेतात भरपूर खेळलो मजाक केली माझ्या बरोबर असलेले भावंड यांच्याशी पकडापकडी, लपंडाव असे खेळ खेळून फार दमलो आणि शेवटी शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसलो.
भावांना पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेलेले होते त्यांना मी माझ्यासाठी पाणी आणायला सांगितले. विहिरी जवळ गेल्यावर ते सगळे खेळत असल्याचे मला दिसले परंतु मी खूपच थकून गेलो होतो. वाऱ्याची एक छान झुळूक आली आणि म्हणाला गारवा वाटला. अचानक आवाज आला आता थोडा वेळ शांत बस आणि माझ्या सावलीचा आनंद घे. मी घाबरून इकडे तिकडे बघू लागलो तर पुन्हा आवाज आला अरे अजिबात घाबरू नकोस.
आवाज कुठून येतो आहे म्हणून मी इकडे तिकडे बघू लागलो परत आवाज आला अरे घाबरू नकोस मी तुझ्या झाडाखाली बसला आहेस ते आंब्याचे झाडच बोलत आहे. हे ऐकल्यावर तर माझी चांगली घाबरगुंडी उडाली. झाड पुन्हा माझ्याशी बोलू लागले. अरे माझ्या सावलीतच तर तुझे वडील त्यांचे वडील म्हणजे तुझ्या आजोबा हे खेळून मोठे झालेले आहेत. तू म्हणते मी बघत असलेले तिसरी पिढी आहेस सर्वांनी माझ्या गोड फळांचा मनमुराद आनंद घेतला आहे आणि मलाही त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून खूपच तृप्त झाल्या सारखे वाटते.
तुझ्या पणजोबांनी आणून मला याठिकाणी लावले होते. तेव्हा मी फारच लहान होतो मोठा होऊन मी िसर्या पिढी पर्यंत सगळ्यांच्या दर्शन घेत राहील आणि सगळ्यांना माझ्या गोड गोड फळांचा आनंद देत राहील असे मला कधीच वाटले नव्हते.
तुझे पण आजोबा गेल्यानंतर मला फार दुःख झाले परंतु तुझ्या आजोबांनी देखील माझी फारच प्राणपणाने काळजी घेतली ते मला दररोज पाणी घालायचे आणि मीही भरपूर पाणी पिऊन समाधान पावल्यासारखा सुखाने जगत होतो. तुझे आजोबा थकल्यावर तुझ्या वडिलांनी देखील माझी चांगली काळजी घेतली. वय वाढल्यामुळे आजोबा पुन्हा पुन्हा शेतात येत नाहीत परंतु ते जेव्हा येतात तेव्हा माझ्या थंडगार सावलीत नक्की विश्रांती घेतात.
ते जेव्हा माझ्या सावलीत येतात तेव्हा त्यांना बघून अगदी आनंदी होऊन जातो मी. त्यांनी मला जगवलं माझी काळजी घेतली त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून मी त्यांना माझ्या सावलीत कशी गार झोप लागेल याचीच चिंता करत असतो.
अगदी मनापासून आंब्याच्या झाडाचे ते बोलणे ऐकत होतो आता माझ्यातील भीती जाऊन थोडासा धीर आला होता. मी आंब्याच्या झाडा शी बोलू लागलो मला तुझ्या सावलीत फारच गार आणि छान वाटत आहे मी आता जेव्हा ही शेतात येईल तेव्हा तुझ्याजवळ नक्की येईल तुम्ही माझ्याशी भरपूर गप्पा मारत जा. मला तुझ्याकडून आजोबा पणजोबा आणि वडिलांविषयी च्या अनेक गोष्टी ऐकून घेण्याची खूप इच्छा निर्माण झालेले आहे.
नाही माझ्या बोलण्याला लगेच उत्स्फूर्त उत्तर दिले हो बाळा मलाही ह्या सर्व गोष्टी तुला सांगायला खूपच आवडेल आणि माझे मन तुझ्याकडे मोकळे करायला मिळेल याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्यासारख्या एका झाडाचे मनोगत तू एवढ्या शांततेने ऐकत आहेस तर मला ही तुझ्याशी गप्पा मारण्यात खूपच आनंद येईल. पण आपल्यातले हे गुपित कुणाला सांगू नको.
चल आता तुझी भावंडे तुझ्यासाठी पाणी घेऊन तिकडेच येत आहेत आपण पुन्हा कधीतरी बोलू एवढे बोलून झाड शांत झाले मलाही निसर्गाचा उत्तम आविष्कार असलेले एक झाड माझा मित्र म्हणून भेटले यामुळे मी मनोमन खूप आनंदी झालेलो होतो आणि त्यामुळे माझा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. भावंडांनी आणलेले पाणी पिले बाळसे वडिलांच्या पायांना घट्ट मिठी मारते त्या पद्धतीने मी झाडाला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. झाड माझ्याकडे वडिलकीच्या दृष्टीने बघत आहे असे मला वाटले. माझी भावंडे माझ्याकडे बघतच होती. परंतु मला त्यांच्याकडे बघण्यात काहीही रस वाटत नव्हता पण मी आज माझ्या वेगळ्याच मित्राला भेटलो होतो मनात पुढच्या भेटीचे गोड स्वप्न बघत आम्ही सगळे घराकडे निघालो.
हा निबंध लोक खालील नावानेही शोधतात
- |मी झाड बोलते आहे | mi jhad bolate aahe
- |झाडाची आत्मकथा | jhadachi atmakatha
- |झाडाचे आत्मवृत्त |jhadache atmavrutt
- |झाड बोलू लागले तर | jhad bolu lagale tar
- |झाडाची आत्मकथा दाखवा
- |वृक्षाचे मनोगत | vrukshache manogat
- |mi zad boltoy marathi nibandh
- | manogat of tree
झाडाचे मनोगत असा अजून एक निबंध वाचायला इथे क्लिक करा .
प्रिय मित्रांनो तुम्हाला हा एका झाडाचे मनोगत निबंध कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया मला प्रेरणा देतात.
एक विनंती कराविशी वाटते तुम्हाला हा निबंध आवडला तर तसे कमेंट नक्की करा म्हणजे मी अजून यावर आधारित दुसरा निबंध तुमच्यासाठी लिहीन . ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल खूप खूप धन्यवाद.
- शेतीचे मनोगत | शेत बोलू लागले तर |shetiche manogat
- झाडाचे मनोगत |आत्मवृत्त मराठी निबंध , भाषण ,लेख |
- श्रावणातील पावसाची वशिष्ट्ये
- एका पुतळ्याचे मनोगत | eka putalyache manogat
- संगणकाचे मनोगत | sanganakache manogat
- उंदराचे मनोगत मराठी निबंध
- एका घराचे मनोगत मराठी निबंध
- निरोप समारंभाचे भाषण
- चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध |chahache manogat
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.