एका पुतळ्याचे मनोगत | मराठी आत्मकथनात्मक निबंध | Eka putalyache manogat essay in marathi

jivmarathi.blogspot.com

            प्रत्येकाला मन आणि भावना असतात असे सगळीकडे म्हटले जाते परंतु कोणाचे मन आणि भावनाा दुखावल्या जाणार नाहीत. याचा मनापासून विचार करणारी माणसे दुर्मिळ होत चाललेले आहेत. असाच माझ्या बरोबर एक प्रसंग घडला त्यात सजीव तर सोडा एक निर्जीव पुतळा बोलू लागला . 

   |  एका पुतळ्याचे मनोगत मराठी निबंध |
| putalyache manogat marathi nibandh |
|atmakathanatmak nibandh|

                रविवारचा दिवस होता . शाळेला सुट्टी होती .त्यामुळे मी घरीच होतो. टीव्हीवर माझे आवडते कार्टून बघत बसलो होतो. तितक्यात आईने मला दुकानावर जाऊन तेल आणण्यासाठी पाठवले.  नाईलाजाने का होईना परंतु तेल घेण्यासाठी मी पिशवी घेऊन निघालो सोबत तेलाचा डबा घेतला होता .  दुकानावर पोहोचलो तेव्हा तिथे खूप गर्दी होती त्यामुळे त्या चौकातच असलेल्या एका पुतळ्याजवळ मी जाऊन बसलो. 
             उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला होता. पाण्याची तहानही लागली होती. दुकानातील गर्दी थोडी कमी होण्याची वाट बघत मी तिथे बसलो होतो. इतक्यात माझ्या मागून आवाज आला खूप ऊन आहे आज. मी दचकून मागे बघितले तर कोणीही उभे नव्हते. मला भास झाला असे वाटले परंतु पुन्हा आवाज आला. मी घाबरलो तेव्हा अरे घाबरू नको मी हा पुतळा बोलतो आहे. असा आवाज आला त्यावर मी अधिकच घाबरलो तेव्हा पुतळा बोलू लागला अरे घाबरू नकोस आणि इथून जाऊ नकोस माझा आवाज फक्त तुला ऐकू येतो आहे. मला तुझ्याजवळ माझे मनोगत व्यक्त करायचे आहे कृपया ते ऐकून घे.
             या चौकात मला आणले तेव्हा गावातील मोठ्या राजकीय पुढार्‍याने. स्वतःचा स्वार्थ साधून झाल्यानंतर त्यांनी कधी माझ्याकडे लक्ष दिले नाही. आज माझी ही अवस्था तो बघतो आहेस किती दुर्दशा झाली आहे. हे तुला लगेच समजेल. तुला जसे ऊन लागते आहे तसेच मलाही लागते. सुरुवातीला काही दिवस माझ्या डोक्यावर एक छत्री होती परंतु वाऱ्याने तीही उडून गेली. आता या उन्हामध्ये मी अनेक वर्षे उभा आहे.
        माझ्यावरचा रंगही आता फिकट होऊन उडून गेला आहे. परंतु कोणाचेही लक्ष त्याकडे नाही. जर आमच्याकडे लक्ष द्यायचे नसते तर मग आमची स्थापना का करता ? 
        पुतळ्याचे बोलणे ऐकल्यानंतर मी म्हटलं की पण दरवर्षी तर इथे कार्यक्रम होतो मग तुम्ही असे नाराज का होता? यावर  पुतळा म्हणाला वर्षातून फक्त एकदाच लोकांना माझी आठवण होते त्यानंतर मात्र कुणी ढुंकूनही पाहत नाही.
           माझ्यासारखेच प्रत्येक चौकामध्ये वेगवेगळे पुतळे उभे केले आहेत. त्या सगळ्यांची अवस्था देखील माझ्यासारखीच झाली आहे. या व्यक्तिमत्त्वांचे प्रतिनिधित्व करत आम्ही या ठिकाणी उभे आहोत त्यांची महानता, त्यांचे गुण, त्यांची कीर्ती, त्यांचे कार्य याचे अनुकरण मात्र कोणीही करत नाही.
      असो फक्त दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा आणखी काही आमच्या हातात नाही. एवढे बोलून पुतळा बोलायचे बंद झाला. इकडे दुकानातही गर्दी कमी झालेली होती .मीही तेल घेऊन घरी निघालो.

या निबंधाचा लोक खालील प्रमाणे शोध घेतात
  1. | एका पुतळ्याचे मनोगत मराठी मध्ये
  2. | पुतळ्याचे मनोगत आत्मकथनात्मक निबंध
  3. | Autobiographical essay
  4. | एका पुतळ्याचे मनोगत मराठी आत्मकथनात्मक निबंध
  5. |मी पुतळा बोलतो आहे
  6. |पुतळा बोलू लागला तर
  7. |एका पुतळ्याची कैफियत 
      तुम्हाला खालील निबंध वाचायला हि नक्कीच आवडतील.
  1. शेतीचे मनोगत | शेत बोलू लागले तर |shetiche manogat 
  2. झाडाचे मनोगत |आत्मवृत्त मराठी निबंध , भाषण ,लेख | 
  3. श्रावणातील पावसाची वशिष्ट्ये
  4. एका पुतळ्याचे मनोगत | eka putalyache manogat 
  5. संगणकाचे मनोगत | sanganakache manogat 
  6. उंदराचे मनोगत मराठी निबंध 
  7. एका घराचे मनोगत मराठी निबंध 
  8. निरोप समारंभाचे भाषण 
  9. चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध |chahache manogat

       तुम्हाला निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमचे विचार आम्हाला कळवायचे असतील तरीदेखील कळवा. तुमचे विचार जाणून घेण्यात आम्हाला आनंदच होईल. तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही आम्हाला सांगा तुमची मदत करणे यात फारच मजा येईल. खूप खूप धन्यवाद.
      



Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने