jivmarathi.blogspot.com
आज आपण पाहणार आहोत माझी आई या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध
माझी आई
आई हा अनमोल शब्द आहे .आई या शब्दांमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे .आई प्रेम, त्याग व सेवा यांचे खरी प्रतीक आहे . प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्व अधिक आहे. माझी आई माझे सर्वस्व आहे .ती माझी गुरु ,मार्गदर्शक तसेच खरी मैत्रीण आहे.
ती दररोज सकाळी लवकर उठते .आमच्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेते .माझी आई माझ्यावर चांगले संस्कार करते .मला चांगले काय ?वाईट काय? हे समजावून सांगते. माझी आई मला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवन कसे जगावे? हे शिकवते.
ती खूप प्रेमळ कष्टाळू व समजूतदार आहे. मी आजारी असताना ती माझी खूप काळजी घेते. गोरगरीब व गरजूनाही ती वेळोवेळी मदत करते. माझी आई मला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. ती माझी प्रेरणा आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान मानते कारण देवाने मला इतकी प्रेमळ समजूतदार आई दिली आहे .
धन्यवाद.
अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंध व भाषणासाठी ब्लॉगला अवश्य सबस्क्राईब करा
निबंध क्रमांक दोन
आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत, पण या शब्दात नभाइतके सामर्थ्य आहे. आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते . सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे. आईची महती सांगत माझे शब्द भांडार अपुरे पडते. माझी आई म्हणजे माझा गुरु, कल्पतरू सौख्याचा सागर, प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार व अमृताची धार आहे.
मी या जगात आल्यापासून माझ्यावर मनसोक्त प्रेम करणारी, मला जीवन कसे जगायचे हे शिकवणारी माझी आई माझा आदर्श आहे. बालपणापासून माझ्यावर लक्ष ठेवणारी माझी आई थोर आहे .सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माझ्यावर लक्ष ठेवणारी माझी आई थोर आहे .
ती जरी सामान्य असली तरी मला ती असामान्य वाटते. छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजामाता असो किंवा कोणत्याही महान व्यक्तीला घडवणारी महान आई असो त्यांच्या तुलनेत माझी आई तशीच आहे .मला महान बनवण्यासाठी किती दिवस रात्र कष्टत असते.
माझ्या प्रत्येक चुका ती वेळीच लक्षात आणून देते. माझे प्रेरणास्थान माझी आई आहे. तिच्यामुळेच आज मी माझ्या क्षेत्रात यशस्वीपणे प्रगतीपथावर आहे .आमच्या घराचा आत्मा, ईश्वर आहे. माझ्या आईवर मी खूप प्रेम करतो. आणि तिच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाला नेहमी प्रार्थना करतो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आईची सेवा करू इच्छितो .
आपण पाहणार आहोत माझी आई या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध माझी आई ममता आणि वाचनाची मूर्ती आहे आणि पुढे आईसारखे दैवत या जगामध्ये तर मराठी निबंध माझी आई वाचण्याची मूर्ती आहे आई पुढे स्वर्गाची महात्मे कमी पडते आई सार खे जगामध्ये कुठेही नाही आई ही प्रत्येकाच्या आयुष्यात एक वरदान आहे तिच्या आशीर्वादाने आपण घडतो आणि ही थोर गुरु आहे म्हणूनच गांधीजी असे म्हणत एक आई शंभर गुरु गुणी श्रेष्ठ आहे माझी आई माझा अभिमान आहे ती माझी गुरु मार्गदर्शक आणि जिवलग मैत्रीण आहे ते खूप प्रेमळ शाळा व समजूतदार आहे माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आहे ते सर्वांची निस्वार्थपणे सेवा करते माझी आई माझ्यावर शिक्षणाचे व सद्गुणांचे चांगले संस्कार करते माझ्या प्रगतीसाठी मला नेहमी प्रेरित करते. जीवनामध्ये काय योग्य व काय अयोग्य समाज.
माझी आई निबंध । माझी आई भाषण ।
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.