बस स्थानकावर एक तास, मराठी निबंध | an hour at the bus stop , marathi essay

 

|बस स्टॉप वर एक तास , मराठी निबंध|
 |बस स्थानकावरील एक तास

         जुलैच्या सुरुवातीला पंधरा दिवस उलटले होते आणि पावसाचा जोर अजून वाढला होता. पावसाची रिमझिम बिनदिक्कत सुरू होती . काल रविवार पासून नवीन आठवडा सुरू झाला . मी सोमवारी शाळेत जाण्यासाठी बसस्थानकावर आलेलो होतो. मी रोज परगावी शिक्षणासाठी जातो. त्यामुळे बसने प्रवास करणे हे माझे ठरलेलेच होते.
    रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी शाळेत जाण्यासाठी माझ्या मनात उत्साह होता. जेव्हा आम्ही बस स्टॅंड वर पोहोचलो तेव्हा सर्वत्र प्रवाशांची रेलचेल होती. वरुण राजामुळे बस स्टॅन्ड वर चिखलाचे साम्राज्य पसरले होते सगळीकडे पाण्याचे डबके साचलेले होते . डबक्यातून पुढे जाताना प्रवासी पुढे मार्ग काढत होते.   



         मी प्रवाशांसाठी बांधलेल्या एका मोठ्या इमारती जवळ उभा होतो. मी माझ्या गाडीची वाट पाहत होतो . येणारे आणि जाणारे सर्व प्रवाशांकडे बघत होतो. सर्वत्र सुंदर रंग काम करून बस स्टॅन्ड सजवलेला होता. प्रवाशांनी ये-जा केल्याने चिखलाचा एक वेगळाच नमुना तयार झालेला होता.
        एका लहान मुलाने आपल्या आईचा हात धरलेला होता ते पावसाच्या पाण्याने भरलेल्या एका डबक्या जवळ आले ,पण मुलगा त्या डबक्यात जायला घाबरत होता . डबक्यात आकाशाचे प्रतिबिंब होते. म्हणून त्या मुलाने विचार केला की , जर मी डबक्यात पाय ठेवला तर मी खोल पाण्यात बुडेल . मला हे बघून खूप मजा येत होती.
        बस स्टँड समोर एक मोठे मैदाना सारखे पटांगण होते. पटांगणाच्या चारही बाजूंनी वेगवेगळी दुकाने होती. तिथे एक छोटी टपरी होती. त्या टपरी वर इतर दुकान आणि पेक्षा जास्त गर्दी दिसत होती. काही नियमित प्रवास ही देखील तिथे थांबलेले दिसले. त्यांच्या कपड्यांवरून ते नोकरदार आहेत हे मला लक्षात आले.
     तेवढ्यात  घाणेरडे कपडे घातलेला एक तीस पस्तीस वर्षांचा माणूस माझ्याशेजारी उभ्या असलेल्या माणसाकडे पोहोचला. त्याने पैशांची भीक मागितली. माझ्या शेजारी उभा असलेला त्या भिकाऱ्याला रागवत म्हणाला भीक कशाला मागतोस एवढा चांगला तरूण दिसतो. कुठे तरी काम कर आणि पैसे कमव भीक मागताना लाज वाटत नाही का? भिकारी काहीही न बोलता निघून गेला.
       माझ्या मनात सारखा एकच प्रश्न येत होता देवाने इतके चांगले शरीर दिलेले असतानाही कष्ट करायचे सोडून लोक भीक का मागतात ? 
        या प्रश्नाच्या उत्तरात माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. विचारांमध्ये हरवलेला असतानाच अचानक आमची बस आली. धावत जाऊन बस मध्ये बसलो आणि शाळेच्या दिशेने निघालो.


             प्रिय मित्रांनो तुम्हाला हा मी लिहिलेला निबंध बस स्थानकावरील एक तास कसा वाटला ? हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला देखील असे बसस्थानकावर थांबण्याचा कधी प्रसंग आला आहे का ?
 बस स्थानकावर तुमचा वेळ कसा गेला ? याविषयी तुमचे मत नक्की व्यक्त करा. धन्यवाद.      
          
हा निबंध लोक खालील नावाने शोधतात.
  1. | बस स्थानकावरील एक तास निबंध
  2. | बस स्थानकावर एक तास निबंध
  3. | बसस्टॉपवर एक तास मराठी निबंध
  4. | बस स्टॅन्डवर एक तास
  5. | बस स्थानक निबंध
तुम्हाला खालील निबंध देखील आवडतील.

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने