शाळेचे मनोगत मराठी निबंध |shaleche manogat nibandh in marathi

jivmarathi.blogspot.com

|shaleche manogat nibandh in marathi , मित्रांनो आज आपण शाळेचे मनोगत मराठी निबंध बघूया तरी हा निबंध तुम्हाला खूप आवडेल ,अशी मला खात्री आहे आपण निबंधास सुरुवात करूया.

शाळेचे मनोगत मराठी निबंध 
|shaleche manogat nibandh in marathi 


      |shaleche manogat nibandh in marathi ,शाळेचे महत्त्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूपच मोठे आहे. ज्याप्रमाणे कुंभार ओल्या मातीला आकार देऊन त्यापासून सुंदर वस्तू तयार करतो . त्यापद्धतीनेच शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य आकार देण्याचे काम केले जाते .. शाळा बोलू लागली तर ती आपल्याला काय सांगेल आपल्याशी काय गप्पा मिळेल याची कल्पना करून हा एक छान निबंध शाळेचे मनोगत लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे. निबंध वाचून निबंध कसा वाटला हे नक्की सांगा चला तर बघूया मग एक छानसा निबंध शाळेचे मनोगत किंवा शाळा बोलू लागली तर ,shala bolu lagli tar marathi nibandh


shaleche manogat nibandh in marathi
shaleche manogat nibandh in marathi 

    शाळेचे मनोगत मराठी निबंध 
किंवा
 शाळा बोलू लागली तर मराठी निबंध


        मी जिल्हा परिषद शाळा ताहाराबाद या ठिकाणी शिकत होतो. माझी शाळा मला खूप आवडत असे परंतु ती फक्त इयत्ता पाचवी पर्यंत होती. पाचवी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी जाणे भागच होते. मी ही पाचवी उत्तीर्ण झाल्यानंतर आमचा निरोप समारंभ आयोजित केलेला होता.

        निरोप समारंभाच्या दिवशी शाळेमध्ये  सगळी मुले जमा झालेली होती. प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले. मीदेखील मला जमेल तसे मनोगत व्यक्त केले शाळे विषयीच्या माझ्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त केल्या. निरोप समारंभाचा कार्यक्रम संपल्यानंतर सगळे जण आपापल्या घरी निघाले. आता मात्र शाळेतून पाय निघत नव्हता.

        शाळेच्या गेटमधून बाहेर आलो तितक्यात मला मागून कोणीतरी हाक मारली आज जसा माझ्या गेटमधून तुझा पाय बाहेर निघत नाही त्या पद्धतीने ज्या वेळी भविष्यात तू यशस्वी होशील तेव्हा याच गेटमधून मोठ्या अभिमानाने आत यायला अजिबात विसरू नको. मी इकडे तिकडे बघू लागलो तेव्हा पुन्हा आवाज आला अरे घाबरू नको मी शाळा बोलते आहे.

       ज्या वेळी विद्यार्थी याठिकाणी नवीन प्रवेश घेतात तेव्हा ते रडत येतात. पहिलीला प्रवेश घेणारी मुले बघून तर मला फारच गंमत वाटते ते इतके रडत असतात की जणू त्यांना आता इथून पुन्हा घरी जाता येणार नाही.

      येथील शिक्षक देखील फारच चांगले आहेत. प्रत्येक मुलाला चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी ते अगदी प्रामाणिकपणे कष्ट करतात. रडणारी ही मुले काही दिवसातच हसत हसत शाळेत येऊ लागतात.

       माझ्या कुशीत येणारे बाळ म्हणजे ओल्या मातीचा गोळा असतो आणि ह्या ओल्या मातीच्या गोळ्याला या ठिकाणी आणि खूप चांगल्या पद्धतीने आकार दिला जातो व एक उच्च व्यक्तिमत्त्व घडवले जाते.

       माझी मला थोडीशी जुनी आहे पर्यंत सर्व मुलांनी आनंदाने या ठिकाणी यावे शिकावे खेळ खेळावेत त्यांचे खेळण्याचा आवाज त्यांचा बोलण्याचा आवाज त्यांचा गोंधळ या माझ्या भिंतीमध्ये घुमावा असेच मला वाटते.
   
      तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी आता बाहेर गावी जाणार माझ्या जवळ असताना तुम्हाला जे ज्ञान आणि अनुभव मिळाले त्याचा उपयोग आता तुम्ही तुमच्या नवीन शाळेमध्ये करा आणि एक यशस्वी नागरिक म्हणून भारत देशाचा कारभार स्वतःच्या हातात घ्या अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते.

       
       दरवर्षी जेव्हा मला नवीन रंग दिला जात असे त्यावेळी तुम्ही बालगोपाल मंडळी किती मनापासून मला रंग देत असत. शाळेच्या एका भिंतीवर तुमच्या सगळ्यांच्या हाताचे ठसे उमटवलेले आहेत तो उपक्रम मला फारच आवडतो. तुमच्या इवल्याश्या हातांचे ठसे बघून मला नेहमी तुमची आठवण येत राहते.

      तुम्ही मला विसरू नका अशी मी तुम्हाला विनंती करेन कारण की धकाधकीच्या जीवनामध्ये ज्यावेळी तुम्ही यशाची नवनवीन शिखरे सर कराल त्यावेळी या तुमच्या विद्याच्या दालनाला विसरू नका.

      या माझ्या प्रांगणामध्ये तुम्ही खेळत बागडत मोठे झालात आणि आज मला सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जाण्याची वेळ  आलेली आहे. आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट स्थिर नसते आपल्या आवडीच्या व्यक्तींना आपल्याला सोडून जावेच लागते. कधी तरी विरहाचे हे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतातच. माझ्याही आयुष्यात असे प्रसंग दरवर्षी येतातच. परंतु विरहाच्या याप्रसंगी याबरोबरच तुमच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने देखील माझ्या डोळ्यांसमोर असतात. म्हणून विरहाच्या दुःखापेक्षा तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आनंद मला अधिक सुखावतो.



     प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा मी शाळा बोलते आहे किंवा शाळेचे मनोगत मराठी निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच मला अजून कोणत्या प्रकारचा निबंध हवा असेल तर ते देखील मला कळवा. मी माझ्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन.

या निबंधाचा  लोक खालील प्रमाणे  शोध  घेतात .
  • मी शाळा बोलते आहे 
  • शाळेचे आत्मवृत्त 
  • शाळेचे आत्मकथन            

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने