| मोबाईलचे मनोगत |mobile che manogat | autobiography of mobile in Marathi

jivmarathi.blogspot.com

       मोबाईल चे मनोगत
 किंवा
 मी मोबाईल बोलतो आहे
 किंवा 
मोबाईल बोलू लागला तर मराठी निबंध.


        नमस्कार मित्रांनो मी मोबाईल बोलतो आहे. मोबाईल नाच मराठी मध्ये भ्रमणध्वनी असे म्हणतात. भ्रमणध्वनी याचा अर्थ भ्रमण करत राहणारा. असेच म्हणावे लागेल कारण की बघाना मला तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. सगळीकडेच मी तुमच्यासोबत येत असतो.

       ज्यावेळी मोबाईलचा शोध लागलेला नव्हता तेव्हा संधी शोधण्यासाठी आपल्याला फक्त पत्र किंवा एखाद्या व्यक्तीकडे निरोप पाठवणे एवढेच करावे लागत असे. मोबाईलचा शोध लागल्यावर मात्र सर्वच गोष्टी अगदी सोप्या होऊन गेल्या.



    मोबाईल मुळे अनेक पैशांचे व्यवहार ऑनलाइन होत आहेत. मोबाइल बंद असेल तर आपले दूरचे नातेवाईक मित्रमंडळी तसेच व्यवसायिक लोकांशी संवाद साधणे अशक्य होईल. आजच्या आधुनिक युगात स्मार्टफोन मध्ये सर्व काही उपलब्ध आहे .घरात खुर्चीत आरामात बसून तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जगभरातील कोणतीही माहिती सहज मिळवू शकता.
  
     ऑनलाइन शॉपिंग साठी प्रसिद्ध असलेल्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट अलीबाबा यासारख्या वेबसाईट मोबाईल मुळे खूप समृद्ध झाल्या आहेत. मोबाईल कोणालाही ऑनलाइन स्टोर उघडण्याची आणि त्यांचा मालक जगाच्या कानाकोपऱ्यात सहजपणे नेण्याची परवानगी देतो. संगणक देखील खूप उपयुक्त आहेत परंतु संगणकाची जवळपास सर्व कामे मोबाईलवरून करता येतात
   
    मानवी जीवन अतिशय सोयीस्कर बनवणारी विविध ॲप्स मोबाईल मध्ये आले आहेत. मोबाईल फोनच्या मदतीने वर्तमानपत्रातील मथळे सहज वाचता येतात त्यामुळे जगभरात काय चालले आहे ते लगेचच पाहता येते. मोबाइल बंद असेल तर मात्र हे सर्व समजून घेण्यासाठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते.

    ऑनलाइन शॉपिंग सह तुम्ही कोणत्याही विशेष शारीरिक श्रमाशिवाय हजारो रुपयांची घरबसल्या सहजपणे खरेदी करू शकता. दाजी वस्तू पाहायची आहे त्याची सर्व माहिती मोबाईल मध्ये वाचता येते. मोबाईल मुळे म्हणजेच माझ्यामुळे आयुष्य किती सुखकर झाले आहे.

 mobile che manogat ,marathi nibandh 

    तुम्ही अनोळखी प्रदेशात गेल्यावर तेथील रस्ते तुम्हाला माहीत नसतात. अशावेळी मोबाईल वरून गुगल मॅप च्या मदतीने नेमका मार्ग शोधून इच्छितस्थळी पोहोचता येते. तुम्ही हरवल्यास तुमचा पत्ता तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवू शकता यामुळे किती त्रास वाचतो. मात्र मोबाईल बंद केल्यास पुन्हा त्रास सहन करावा लागणार आहे.

    जेव्हा तुम्हाला अचानक तुमच्या प्रियजनांना काही आनंदाचे आणि दुःखाचे संदेश द्यायची असतात तेव्हा मोबाईल सारखे दुसरे साधन नाही.

   एक मात्र नक्की मोबाईल बंद असेल तर मोबाईल वर विविध ॲप्स पाहण्यात, गेम खेळण्यात आणि इंटरनेट वापरण्यात तुमचा बराच वेळ वाया जातो. ही वेळ नक्कीच वाचवता येईल . मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होतात . दृष्टिदोष देखील होतो. तथापि ,मोबाइल बंद असल्यास आपण हे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळू शकतो.

     मोबाईल हे उपकरण आहे त्यामुळे त्यात स्वतंत्र विचार नाही. माझा म्हणजेच मोबाईलचा किती वापर करायचा हे प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनुसार ठरवावे मोबाईल फोन बंद ठेवल्यास काही गर गैरसोय होतील. त्या पद्धतीने काही फायदे होतील.
    
    त्यामुळे माझा तुम्ही अगदी समर्पकपणे आणि तुमच्या बुद्धीने योग्य पद्धतीने वापर करा ,मग माझ्यासारखा चांगला मित्र तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.




      प्रिय वाचक मित्रांनो ,तुम्हा आला मोबाईलचे मनोगत किंवा मोबाईल बोलू लागला तर मराठी निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच या मराठी निबंधात काही बदल सुचवायचे असतील तर तेही सुचवा.

या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात

  1.  मोबाइल बंद झाले तर मराठी निबंध 
  2. मोबाईल फोन बंद झाले तर 
  3. मोबाईलचे मनोगत 
  4. मोबाईलची कैफियत
  5.  मोबाईलचे आत्मकथन

 प्रिय वाचक मित्रांनो,तुम्हाला हा  | मोबाईलचे मनोगत |mobile che manogat  | autobiography of mobile in Marathi, निबंध कसा वाटला ते मला comment करून नक्की सांगा . तुम्हाला अजून कोणते निबंध हवे असतील तर ते देखील सांगा . आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू .
   


Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने