jivmarathi.blogspot.com
|Chhatrapati Shivaji Maharaj ,छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.
मोठ्या कष्टाने आणि शौर्याने त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हेच शिवाजी महाराज आपल्याशी बोलू लागले तर ते काय बोलतील हे आपण आजच्या या निबंधामध्ये बघूया आपल्या आजच्या निबंधाचे नाव आहे मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय... चला तर बघूया मग हा छानसा मराठी निबंध.
श्री छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय
॥ खबरदार जर टाच मारुनी
जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या ॥
समोर बारा-तेरा वर्षांचा सावळ्या नावाचा मुलगा होता आणि मला - शिवाजीला पुढे जायला अटकाव केला होता. असे माझे सेवक होते, असे आमचे सरदार होते. अशी एकनिष्ठ, प्रामाणिक माणसे आमच्याभोवती होती. म्हणूनच आम्ही स्वराज्याचा पाया घालू शकलो. हिंदू राज्य स्थापन करु शकलो.
शिवनेरी किल्ल्यावर आमचा जन्म झाला. आमच्या पहिल्या गुरु आमच्या मांसाहेब जिजाबाई. त्यांनी आम्हांला लहानपणापासून रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून इतिहास आणि राजकारणाचे पाठ दिले. आमच्या काळातील प्रजेची काय दैना होती, त्याची जाणीव करुन दिली.त्यावेळी ठिकठिकाणी हिंदू राजांची छोटी छोटी राज्ये होती. हे राजे आपापसांतभांडत होते. त्यांचे सरदार, देशमुख प्रजेला छळत होते. त्यातून मुसलमान राजांना भारतातील सोन्याचा धूर दिसत होता. ते मराठी मुलुखावर स्वारी करत. मोठा मुलुख बेचीराख करीत.गांवे लुटून संपत्ती घेऊन जात होते. मंदिरे लुटून मूर्ती फोडून टाकत होते. आया-बहिणींनापळवून नेत भ्रष्ट करीत आपल्या जनानखान्यात डांबून ठेवत होते. प्रजा अज्ञानी होती.ब्राह्मण कर्मकांडात गुंतले होते. मांसाहेबांनी आम्हांला याची जाणीव करून दिली. सर्वांना एकत्र आणून स्वराज्य सुराज्य स्थापण्याची आम्हांला प्रेरणा दिली.,त्यानंतर आबासाहेबांनी आमच्यासाठी दादोजी कोंडदेवांना गुरु म्हणून पाठवले.त्यांनी आम्हांला युद्धातील डावपेच शिकवले. तलवार, भाला चालवण्यास शिकवले.घोड्यावर बसण्यास शिकविले आणि राजकारणाचे धडेही दिले. समोरचा माणूस कसा आहे हे ओळखण्याची किमया आम्हांला मांसाहेबांकडून शिकायला मिळाली.
वयाच्या सोळाव्या वर्षी आम्ही रोहिडेश्वराच्या मंदिरात मावळ्यांच्या मित्रपरिवारासह स्वराज्याची शपथ घेतली आणि एक एक किल्ला सर केला. त्याची व्यवस्थालावली. परमेश्वरकृपेने आणि तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आम्हांला कधीही धन कमी पडले नाही. तोरणा किल्ल्यावर खजिना सापडला. कल्याणचा खजिना आम्ही लुटून आणला. तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, येसाजी कंक वगैरे अनेक प्रामाणिकसरदार आम्हांला मिळाले. ते स्वराज्य उभे करण्यासाठी तळहातावर शिर घेऊन लढले.युद्ध जिंकले पण आमचे एक एक हिरे धारातीर्थी पडले.
स्वराज्याचा राज्यकारभार चालवण्यास आमच्याजवळ अष्टप्रधान होते. ते सर्व उत्तम काम करणारे होते.
राजकारणात मुरब्बी होते.आणखी एक उत्तम गुरु आम्हांस देवाने दिला होता. ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांनी तर आम्हांला राजकारणच नव्हे तर गनिमी काव्याचेही शिक्षण दिले. ते सतत आमच्या पाठीमागे उभे होते. अनंत अडचणीत त्यांनी आम्हांला मार्गदर्शन केले.संकटातून सोडविले. स्वामींनी आमची परीक्षाही घेतली. त्यांच्या अनेक शिष्यांनी आमच्यासाठी हेरगिरी केली. त्यांनी आम्ही कोठेही असलो तरी शत्रू पक्षाची बित्तम बातमी आम्हांस पोचविली. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, समर्थांच्या मार्गदर्शनाने, दादाजी कोंडदेवांच्या शिक्षणाने आणि मांसाहेबांच्या संस्काराने, प्रेमाने आम्ही एवढे मोठे राज्य निर्माण केलं. आमच्या मित्रांच्या प्रामाणिकपणाने , एकनिष्ठेने ते चालवले, वाढवले.
एकदा सामनगडावर बांधकाम चालू होते. आम्ही कामाची पाहणी करण्यासाठीगडावर गेलो होतो. त्या ठिकाणी हजारो गवंडी, सुतार, पाथरवट, बेलदार लोक काम करीतहोते. ते पाहून आमच्या मनात क्षणभर विचार आला की, एवढ्या लोकांच्या कुटुंबालाआम्ही पोसतो. आम्ही त्यांचा पोशिंदा आहोत; असा अहंकार आमच्या मनात उत्पन्झाला. तोच आम्हांस 'जय जय रघुवीर समर्थ' म्हणून आवाज आला. आम्ही मागे वळूनपाहिले. तो समर्थ घेताना दिसले. ते जवळ येताच आम्ही त्यांना वंदन केले आणि विचारते झालो.. " महाराज, या वेळी आपण इकडे कसे ? " त्यांनी उत्तर दिले, “शिवबा, तुमच्या गडाचे बांधकाम कसे चालले आहे ते पाहण्यास आलो आहोत.आम्ही गुरु-शिष्य गडाकडे निघालो. वाटेत एक मोठी शिळा आडवी होती. आम्हीबेलदाराला बोलावून तो मोठा दगड फोडून घेतला. त्यात नारळाएवढी पोकळी होती.त्यात पाणी साठले होते. आणि त्या पाण्यात एक बेडूक पोहत होता. ते पाहून आम्हांला आश्चर्य वाटले.पण समर्थ म्हणाले, “शिवबा, तू येथील कारागिरांना पोसतोस हे ठीक आहे पण या खडकातही तू बेडकाच्या पोषणाची सोय केली आहेस. खरोखर तू त्रैलोक्याचा पोशिंदाआहेस. या बोलण्याने आम्ही खजील झालो. आम्ही समर्थांपुढे नतमस्तक झालो. आमचाअहंकार अशा तऱ्हेने समर्थांनी दर केला.
आम्हांला आठवतो तो अफजलखानाच्या वधाचा प्रसंग, आमच्या गनिमी काव्याने अदिलशहा हादरला होता. त्याने आम्हांस जिवंत पकडून देण्यासाठी विडा दिला होता. तोअफजलखानाने भर दरबारात उचलला होता. तो मोठा फौजफाटा आणि लढाईचे सामानघेऊन आमच्यावर चालून आला. आम्ही राजगडावर होतो. अफजलखान चालून आला हे समजताच आम्ही प्रतापगडाकडे कूच केली. प्रतापगड चढणे खानास अवघड होते. खानाने आम्ही गडाखाली उतरुन यावे म्हणून डावपेच सुरु केले. तुळजापूर, पंढरपूरच्या देवस्थानांना उपद्रव दिला. आम्ही गड सोडला नाही.मग खानाने आम्हास भेटण्याचा इरादा जाहीर केला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीची जागा ठरली भेटीसाठी मोठा शामियाना उभारला होता खान आमची वाटच पाहत होता आम्ही आज प्रवेश करतात खानाने आम्हास आलिंगन दिले आम्हाला ठार करण्यास आमच्या पाठीवर कट्यारिने वार केला पण चिलखतामुळे आम्ही वाचलो.
खानाचा डाव ओळखून आम्ही त्याच्या पोटात घासकण बिचवा खूपसला रावणासारखा उंच धिप्पाड खान खाली कोसळला. सय्यद बंडा आत धावला तो आमच्यावर वार करणार तोच जीवाने त्याच्यावर वार करून आमचा प्राण वाचविला.
Chhatrapati Shivaji Maharaj nibandh in Marathi
आग्य्राहून सुटका करून घेतानाचा प्रसंगही त्यांच्या दरबारात गेलो. त्यांनी आमची दखल घेतली नाही. आम्हांस पाच हजारी सरदारांच्या रांगेत बसविले. आमचा अपमान केला. आम्ही दरबारातून निघून गेलो. बादशहाने दगा करुन आम्हा दोघांना नजरकैदेत टाकले. थोड्याच दिवसांत आम्ही पेटाऱ्यात बसून आमची सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात सुखरुप येऊन पोहोचलो.
शाहिस्तेखानाची पुण्यात खोड मोडली. जीवावरचे बोटावर निभावले. खानाची तीन बोटे आमच्या तलवारीच्या वाराने तुटली. खान वाचला आणि पळून गेला. असे अनेक प्रसंग आम्हांस अजूनही आठवताहेत.स्वराज्य स्थापण्यात ते चालवण्यात आमचा एकट्याचा वाटा नव्हता. तुळजामातेनेआमच्याकडून हे करवून घेतले. त्यासाठी दादोजी कोंडदेव आणि समर्थांना आमचे गुरु म्हणून पाठविले. आमच्या मांसाहेबांनी आम्हांस घडवले. आमच्या सर्व सरदार मित्रांनी आणि अष्टप्रधानांनी आम्हांस सहाय्य केले नसते तर आम्ही इतिहास घडवला नसता.
त्यांच्या मदतीनेच आम्ही आलेल्या संकटातून पार पडलो. ही श्रींची इच्छा.
या निबंधाचा लोक खालील नावाने हे शोध घेतात
शिवाजी महाराज निबंध मराठी मधे
छत्रपती शिवाजी महाराज निबंध
शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती मराठी
शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती pdf
Shivaji Maharaj nibandh Marathi PDF
स्वराज्य निबंध
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.