jivmarathi.blogspot.com
संगणकाचे उपयोग तर आज सगळ्यांनाच माहीत आहेत. संगणकानेे संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकलेे आहेे. मानवानेे प्रगतीची आणि यशाची जी नवनवीन शिखरेे सर केेली आहेत . त्यामध्ये संगणकाचा फार मोठा वाटा आहेे.
| मी संगणक बोलतो आहे प्रसंग लेखन मराठी निबंध
| mi sanganak bolato aahe marathi nibandh
मी संगणक बोलतो आहे. आज मला तुमच्याशी काही गुजगोष्टी करायच्या आहेत. आजच्या काळात माझ्याशिवाय जगणे म्हणजे फारच मोठी तारेवरची कसरत होईल. आज मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणक अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे. असे एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये संगणकाचा प्रवेश झालेला नाही यावरूनच तुम्हाला माझे म्हणजे संगणकाचे महत्त्व लक्षात येईल.
अनेक वर्षांपूर्वी माझा आकार खूपच मोठा होता एखाद्या मोठ्या खोलीत एवढा माझा आकार होता परंतु हळूहळू जशी विज्ञानामध्ये प्रगती होत गेली त्यावेळेस माझा आकारही लहान होऊ लागला आणि आता तर मी अगदी छोट्याश्या टेबलावरही आरामात बसू शकतो इतका लहान आकार माझा झालेला आहे.
विविध प्रकारचे घरे बांधताना त्यांचे नक्षीकाम तयार करणे घर कसे बांधावे याचे आडाखे बांधणे युद्धाच्या प्रसंगी युद्धनीती आखणे शस्त्रक्रिया करताना देखील आरोग्य यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये संगणकाचा उपयोग केला जातो. शिक्षण क्षेत्र तर संगणकाने अक्षरशः व्यापून टाकलेले आहे.
संगणकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवून ठेवता येऊ शकते. ही माहिती आपल्याला हव्या त्या वेळी आपण उपयोगात आणू शकतो. जी कामे करण्यासाठी तुम्हाला तासन -तास वेळ लागू शकतो ती कामे माझ्या मदतीने अगदी एका क्लिकवर तुम्ही करू शकता.
संगणकाच्या उपयोगामुळे वेळेची फार मोठ्या प्रमाणात बचत झालेली आहे. वेळेची बचत झाल्यामुळे तोच वेळ अजून दुसऱ्या उपयोगी कामांमध्ये वापरता येऊ शकतो. चित्रकलेचे काम आहे माझ्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. माझ्या वापरामुळे कागदाची फार मोठ्या प्रमाणात बचत झालेली आहे. कागदाच्या बचतीमुळे वृक्षतोडीचे प्रमाणही कमी झालेले आहे.
असा मी संगणक बहुगुणी आणि बहुपयोगी आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. इतरांच्या उपयोगी पडणे, त्यांचे कष्ट कमी करणे यातच मला खूप धन्यता वाटते.
या निबंधाची खालील नावेही असू शकतात.
- | संगणकाचे मनोगत मराठी निबंध
- | मी संगणक बोलतो आहे
- | संगणक बोलू लागले तर
- | संगणकाची आत्मकथा
- |संगणकाची आत्मकथा मराठी निबंध
- |संगणकाचे विचार
- |संगणकाचे आत्मकथन.
प्रिय मित्रांनो, तुम्हाला हा मी लिहिलेला,, संगणक बोलू लागला तर किंवा मी संगणक बोलतोय निबंध कसा वाटला ? हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.
तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा . मी माझ्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
तुम्हाला हे खालील निबंध वाचायला हि नक्की आवडतील.
- शेतीचे मनोगत | शेत बोलू लागले तर |shetiche manogat
- झाडाचे मनोगत |आत्मवृत्त मराठी निबंध , भाषण ,लेख |
- श्रावणातील पावसाची वशिष्ट्ये
- एका पुतळ्याचे मनोगत | eka putalyache manogat
- उंदराचे मनोगत मराठी निबंध
- एका घराचे मनोगत मराठी निबंध
- निरोप समारंभाचे भाषण
- चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध |chahache manogat
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.