चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध | chahache manogat

jivmarathi.blogspot.com
 
चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध | chahache manogat

              सकाळी  उठून गरम - गरम वाफ निघणारा चहा पिणे, यासारखा आनंद जगात दुसरा नाही. झुरके मारत चहा पिणे हा जगावेगळा आनंद असतो. चहा म्हणजे सगळ्यांचाच जीवाभावाचा मित्र होय. हा चहा बोलू लागला तर, चहा चे मनोगत जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल. चला तर मग आज आपण बघूया एक छानसा निबंध , चहा चे मनोगत. यालाच तुम्ही चहा बोलू लागला तर किंवा मी चहा बोलतोय, असे देखील म्हणू शकता.


चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध | chahache manogat
चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध | chahache manogat


|चहाचे मनोगत
 किंवा 
 |चहा बोलू लागला तर

                नमस्कार मित्रांनो मी चहा बोलतो आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात माझी लोकप्रियता फार मोठी आहे. सकाळी उठल्याबरोबर माझा स्वाद घेतल्याशिवाय बर्‍याच जणांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही.
           चहा बनवण्याची पद्धत फारच सोपी आहे. आता सध्या विविध प्रकारचे चहा बनवण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. कुणी बिना दुधाचा चहा पितो , तर कुणी लिंबू चा वापर करून चहा बनवतो. त्याला ते म्हणतात लेमन टी. दूध न टाकता बनवलेल्या चहाला कोरा चहा असे म्हणतात.
          खूप थकलेले असताना किंवा सकाळी झोपेतून उठल्यावर , सगळ्यांचा मुड ताजा करण्यासाठी माझी आठवण केली जाते. मला पिल्यानंतर लोक खूपच उत्साहाने कामाला सुरुवात करतात. मलाही त्यांचा उत्साह वाढवण्यात खूपच आनंद वाटतो.
         माझी निर्मिती फारच साध्या पद्धतीने केली जाते. आधी माझी झाडे चांगली प्रेमपूर्वक वाढवली जातात. ही झाडे वाढल्यानंतर त्यांना आलेली पाने अलगत खुडून घेतली जातात. ही पाने वाळवून त्यांच्यावर अनेक प्रक्रिया करून मग चहा ची निर्मिती होते. हे चहा पावडर वापरूनच तुमच्या मनाला ताजेतवाने करणारा चहा निर्माण होतो.
        कुणाला सर्दी झाली ,खोकला आला, घसा दुखत असला बरे वाटत नसले ना की माझी आठवण नक्की होते. मग कोणी सुंठ टाकून चहा तयार करतात तर कोणी दालचिनी टाकून चहा बनवतं आणि हो विलायची टाकून केलेला चहा तर सगळ्यांच्या पसंतीस उतरल्याशिवाय राहत नाही.
        काही जण चहावरती साय टाकून पितात त्यालाच मलई चहा असेदेखील म्हटले जाते. सकाळी उठल्याबरोबर चहा मिळाला नाही तर पोटात गुडगुड होत असल्यासारखे अनेक जणांच्या तोंडून मी ऐकलेले आहे.
       चहा बरोबर पाव खारी भिजवून खाण्यामध्ये अनेक जणांना परमानंद मिळतो. सकाळी सकाळी हिवाळ्यामध्ये अंथरुणातून बाहेर पडल्यावर जो गारवा अंगाला झोंबतो तो पळवण्यासाठी गरम वाफाळलेला चहा समोर आला की मनाला आवर घालणं अशक्य होऊन जात.
        माणसाला पिण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची पेये उपलब्ध आहेत परंतु माझी सर मात्र कुणालाही येत नाही. श्रीमंत अन पासून गरिबा पर्यंत सर्वांना माझी सवय झालेली असते. दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी चहा पिणे, ही बऱ्याच लोकांची सवयच झालेली असते.
           ठीक आहे आज तुमच्याशी बोलून मला फार छान वाटलं. स्वतःची काळजी घ्या आणि कधी थकवा जाणवला तर माझी आठवण नक्की काढा. धन्यवाद.

      प्रिय मित्रांनो, तुम्हाला हा  चहा बोलू लागला तर किंवा चहाच मनोगत निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल,तर तुम्ही कळवा. मी माझ्या परीने तुम्हाला निबंध लिहून मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन .

 या निबंधाचे खालील नावेही असू शकतात.
  1. | चहा बोलू लागला तर मराठी निबंध
  2. | मी चहा बोलतो आहे मराठी निबंध
  3. | चहाचे मनोगत मराठी निबंध 
  4. | चहाचे मनोगत मराठी निबंध
  5. |  मी चहा बोलतोय

तुम्हाला खालील निबंध वाचायला  नक्की आवडतील.

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने