मोबाईल फोन बंद झाले तर | Mobile phone band jhale tar, nibandh in Marathi

jivmarathi.blogspot.com

          मोबाईल फोन बंद झाले तर |Mobile phone band jhale tar, nibandh in Marathi ,, हा निबंध आपण आज आपण बघूया. सध्याच्या या या यंत्र युगामध्ये मोबाईल फोनने माणसाच्या जीवनामध्ये हे फार खोलवर प्रवेश केलेला आहे. मोबाईल फोन बोलण्यासाठी वापरले जाणारे हे एक यंत्र चाहे आहे आणि आजच्या या काळामध्ये आपण यंत्रांचे शिवाय राहू शकत नाही. अशी परिस्थिती नक्कीच तयार झालेली आहे.मोबाईलवर माणसांचे अवलंबून राहणे तर फारच गमतीशीर विषय आहे.  मोबाईल फोन बंद झाले तर काय गंमत होईल हे आपण आजच्या या निबंधामध्ये पाहणार आहोत चला तर मग आजचा एक सुंदर निबंध मोबाईल फोन बंद झाले तर



मोबाईल फोन बंद झाले तर |Mobile phone band jhale tar, nibandh in Marathi


| Mobile phone band jhale tar, nibandh in Marathi



        पूर्वीच्या काळी कोणाला काही निरोप द्यायचा असेल किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायचे असेल तर आपल्याला पत्राद्वारे किंवा कोणत्यातरी व्यक्तीकडे निरोप देऊन तो संदेश पोहोच बाबा लागत असे. आत्ताच्या काळात मात्र आपल्याला जी गोष्ट आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाइकांना सांगायचे असेल तर ती आपण फोन च्या साह्याने लगेच सांगू शकतो.
  मोबाईलचे उपयोग
     मोबाईलचा उपयोग आपल्याला कोणकोणत्या कामासाठी होतो याचा जर विचार केला तर त्याची यादी फारच मोठी होईल. मोबाईल वर आपण हिशोब घेऊ शकतो गजर लावू शकतो, विविध ठिकाणांची माहिती मिळवू शकतो शेतीमध्ये देखील कोणते खाद्य द्यावे कोणते पीक कधी लावावे याविषयी माहिती मिळत असते मोबाईल वर गाणे ऐकता येतात टीव्हीवरील विविध मालिका आपल्याला मोबाईल मुळे सहज बघता येतात. सर्वात महत्त्वाचं तर राहीलच आपल्या प्रियजनांशी आपल्याला मनसोक्त गप्पा मारता येतात. विविध प्रकारचे आपल्या आवडीचे गेम्स आपल्याला मोबाईल वर सहज खेळता येतात.

मोबाईलची गरज


      मोबाईलच्या शोधामुळे आणि उपयोगामुळे ळे प्ले अनेक कामे इतकी सोपी झाले आहेत की त्यामुळे आपल्या जगण्याला एक वेगळी दिशाच मिळालेली आहे. मोबाईल वर आपल्याला विविध प्रकारचे पैशांचे व्यवहार देखील सहज पद्धतीने करता येतात. आपण घरातून बाहेर निघालो आणि आपले खिशामध्ये पैसे ठेवायचे आपण विसरलो परंतु मोबाईल जर आपल्या बरोबर असेल तर आपल्याला आर्थिक अडचणींवर सहज मात करता येते ऑनलाइन पद्धतीने आपण इतरांकडून पैसे उधार घेऊ शकतो किंवा वा त्यांना ट्रान्सफर करून त्यांच्याकडून रोख रक्कम आपली वेळ भागवण्यासाठी घेऊ शकत. बँकांमध्ये तासनतास उभे राहण्याची गरज राहिली नाही. मोबाईल फोन बंद झाले तर आपण फारच अस्वस्थ होऊन जाऊ. यामध्ये थोडीही शंका नाही.

मोबाईलचा आपल्या जीवनावर परिणाम


    दैनंदिन व्यवहारांमध्ये अनेक वेळा आपण मोबाइल हाताळत असतो जसे की गाडी मध्ये प्रवास करत असताना, जेवण करत असताना, टीव्ही बघत असताना, खेळताना. पण मोबाईल फोन बंद झाले तर या सर्व गोष्टी करताना आपल्याला नेहमीच काहीतरी कमी असल्याची खंत जाणवत राहील. आपल्या जीवनाचा एक मोठा आधार गेला असे देखील वाटू शकते.
    मोबाईल मध्ये तर विद्यार्थी कोणत्याही घटकाचा अभ्यास त्यांच्या वेळेनुसार व आवडीनुसार करू शकतात. यूट्यूब फेसबुक व्हाट्सअप हे सगळं आजची तरुणाई तसेच इतर सर्व मध्यमवर्गीय व वरिष्ठ मंडळी देखील अत्यंत आनंदात दिसते. मोबाईल फोन बंद झाले तर त्यांचा आनंद हिरावून घेतल्यासारखा होईल.

   मोबाईल फोन बंद झाल्यास होणारे तोटे


मोबाईल फोन बंद झाले तर आपल्याला पाहिजे ते आवडीचे कार्यक्रम आपल्या वेळेनुसार आपल्याला बघता येणार नाही. आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलण्यासाठी आपल्याला वेळ आणि पैसा जास्त प्रमाणात खर्च करावे लागतील. ज्या व्यक्तींची आपण बोललो त्यांच्याशी ती व्यक्ती पुन्हा ज्यावेळेस भेटेल तेव्हाच बोलणे होईल. अनेक व्यवसायिकांची कामे खोळंबून पडतील त्यांचे व्यवहार ठप्प देखील होऊ शकतील. मोबाइल बंद झाले तर औद्योगिक क्षेत्रावर फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होईल. मोबाईलच्या साह्याने कामे करून पैसे कमावणारे व त्याद्वारे आपला उदरनिर्वाह चालवणारे अनेक लोक आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाची साहित्यच निघून जाईल तर त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतील.

मोबाईल फोन बंद झाले तर होणारे फायदे


    मोबाईल फोन बंद झाले तर यूट्यूब फेसबुक व्हाट्सअप इत्यादी सामाजिक माध्यमांवर विनाकारण खर्च होणारा वेळ वाचेल व तो वेळ इतर देशहिताच्या कामासाठी किंवा कष्टाच्या कामासाठी वापरता येईल. मोबाईल फोनचा अतिवापर बंद झाल्यामुळे डोळ्यांचे व मनाचे काही विकार कमी होतील. कुटुंबातील माणसे एकमेकांबरोबर जास्तवेळ घालवतील व त्यामुळे त्यांच्यातील प्रेम संबंध अधिक दृढ होतील. मोबाईल फोन साठी अनेक ठिकाणी टॉवर्स उभे केले जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लहरी निघतात व पशुपक्ष्यांना यामुळे अडचणी निर्माण होतात. पक्ष्यांना त्यांचे घरटे शोधण्यासाठी कष्ट पडतात. मोबाईल फोन बंद झाल्यास पक्ष्यांना देखील त्याचा फायदा होईल. माणसांच्या शरीरावरील ही दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील.

निष्कर्ष


वरील सर्व बाबींचा विचार केला तर आपण असे म्हणू शकतो की मोबाईल हे यंत्र आहे त्याचे सदुपयोग आणि दुरुपयोगही आहेत. मोबाईल फोन बंद झाला तर आपल्याला फायदेही होतील आणि तोटेही होतील. अशावेळी आपल्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक करणे जेणेकरून आपली कामेही थांबणार नाहीत व आपल्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही.
   
धन्यवाद

   प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.
 
    हा निबंध थोडा मोठा आहे परंतु तुमच्या गरजेनुसार व तुमच्या आवडीनुसार तुम्ही यातील काही मुद्दे तुमच्या निबंध लेखनासाठी वापरू शकतात व तुमच्या कल्पनेनुसार नवीन मुद्देही वाढवू शकतात तुम्हाला निबंध लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.

निबंध लोक खालील नावानेही शोधतात


  1. | मोबाईल नसते तर काय झाले असते
  2. | मोबाइल बंद झाले तर मराठी निबंध लिहा
  3. | मोबाईल कायमचे बंद झाले तर
  4. | निबंध मोबाइल बंद झाले तर
  5. | मोबाईल नसता तर मराठी निबंध
  6. | भ्रमणध्वनी बंद झाले तर मराठी निबंध
  7. | मोबाईल नसता तर मराठी निबंध
  8. | आजच्या काळात मोबाईल नसता तर काय परिस्थिती असती

    

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने