jivmarathi.blogspot.com
निबंध क्र.1
घराचे मनोगत
| घर बोलू लागले तर मराठी निबंध|
| gharache manogat|
एका घराचे मनोगत
नमस्कार मित्रांनो, मी एक घर बोलत आहे . आज मी सर्व घरांच्या वतीने माझे विचार व्यक्त करणार आहे .मी तुम्हाला विनंती करतो की ते शांतपणे ऐका.
घरांचे बरेच प्रकार आहेत. जे सांगणे कठीण आहे .भूतकाळातील घरे आणि वर्तमान काळातील घरे यात खूप फरक असल्याचे दिसते. जवळजवळ प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे वाटते. एक मोठा कामगार वर्ग सुद्धा घर बांधण्यासाठी किंवा नवीन घर घेण्यासाठी पैसे उधार घेतो.
घर म्हणजे फक्त चार भिंतींची इमारत नाही घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मधील प्रेम संबंध त्या घरातला आनंद निश्चित करतात घर बांधताना प्रत्येकाच्या मनात घराची सुंदर प्रतिमा असते घरातील सर्व लोक रंग संगती आणि घरात वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तूंकडे बारीक लक्ष देतात.
घराचे मालक फ्लोअरिंग ,नळ, पाण्याची टाकी, आतील रचना , दरवाजे आणि खिडक्या यावर बारीक लक्ष देतात.
माझ्या मध्ये मला सुखी कुटुंब जाताना पाहून खूप आनंद झाला आहे. त्यांचा आनंद वाढतच गेला पाहिजे अशाच प्रकारे मी त्यांना शुभेच्छा देतो.
माझ्या आजूबाजूची लहान मुले सगळीकडे जातात तेव्हा मलाही खूप आनंद होतो जेव्हा येणारे पाहुणे माझं तोंड भरुन कौतुक करतात. तेव्हा मला आकाश चार बोट राहते. मी आनंदाने मोहरून जातो खरोखरच स्वतःचे कौतुक ऐकणे किती आनंद देऊन जाते त्याचा आनंद घेतो.
माझ्या मध्ये राहणारे या कुटुंबातील सर्व सदस्य माझी खूप काळजी घेतात. सगळे अगदी मिळून-मिसळून प्रेमाने राहतात. माझे काहीही नुकसान होणार नाही यासाठी सदैव प्रयत्न करत असतात. दरवर्षी मला छान रंग देतात. रंग दिल्यानंतर माझे सौंदर्य तर अजूनच खुलून दिसते. त्या वेळी मला आकाश ठेंगणे वाटत. अशीच ही सर्व मंडळी माझ्या छायेमध्ये अनेक वर्षांसाठी सुखरूप राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे मनोगत संपवतो.
प्रिय मित्रांनो तुम्हाला घर बोलू लागले तर किंवा घराचे मनोगत मराठी निबंध कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा . तसेच तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे निबंध हवे आहेत ते देखील सांगा. आम्ही आमच्या परीने तुम्हाला निबंध लेखनात नक्की मदत करण्याचा प्रयत्न करू.
या निबंधाचा शोध लोक खालील प्रमाणेही घेतात.
- | घराचे मनोगत मराठी निबंध
- | घर बोलू लागले तर मराठी निबंध
- | घराची कैफियत
- | घराचे आत्मवृत्त
- | पडक्या घराचे मनोगत
निबंधात आलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ :-
१)| आकाश चार बोटे राहणे :- खूप आनंद वाटणे
२)|आकाश ठेंगणे वाटणे :- खूप आनंद वाटणे
तुम्हाला खालील निबंध वाचायला हि नक्कीच आवडतील.
- शेतीचे मनोगत | शेत बोलू लागले तर |shetiche manogat
- झाडाचे मनोगत |आत्मवृत्त मराठी निबंध , भाषण ,लेख |
- श्रावणातील पावसाची वशिष्ट्ये
- एका पुतळ्याचे मनोगत | eka putalyache manogat
- संगणकाचे मनोगत | sanganakache manogat
- उंदराचे मनोगत मराठी निबंध
- एका घराचे मनोगत मराठी निबंध
- निरोप समारंभाचे भाषण
- चहाचे मनोगत | मी चहा बोलतोय मराठी निबंध |chahache manogat
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.