jivmarathi.blogspot.com
मरावे परी कीर्ति रूपे उरावे
मरावे परी कीर्ति रूपे उरावे अर्थ
|marave Pari Kirti Rupe Urave in Marathi
मरावे परी कीर्ति रूपे उरावे |Marave pari Kirti Rupe Urave |
मरावे परी कीर्ति रूपे उरावे
|Marave pari Kirti Rupe Urave
जन्माला आलेला प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक सजीव एक दिवस मरण पावतो या जगात कोणीही अमर नाही. या पृथ्वीवर आजवर कोट्यावधी माणसे जन्माला आली आणि मरणही पावली. परंतु त्यांच्या मधील किती जणांची नावे आपल्याला आठवतात हे महत्त्वाचे आहे.
बोटावर मोजण्यासारख्या काही माणसांचीच नावे आपल्याला आठवतात इतर मात्र काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर माणसांच्या विस्मरणात देखील गेलीत. अर्थात याला काही माणसे अपवाद देखील आहेत.
संत तुकाराम महाराज ,संत ज्ञानेश्वर ,संत एकनाथ महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या अनेक थोर विभूती देखील या पृथ्वीतलावर होऊन गेल्या आणि त्या आज देखील सर्वांच्या स्मरणात आहेत. प्रत्यक्ष देह रूपाने ते या जगात किंवा या पृथ्वीवर अस्तित्वात नाहीत तरीदेखील त्यांनी जिवंतपणे केलेल्या कार्य मात्र आज देखील टिकून आहे आणि त्याचा लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे.
अशी थोर माणसे आपल्या कार्यातूनच अजरामर झालेली आहेत. नीट विचार केला तर आपल्याला असे दिसून येते की या सर्वांनी सतत जनकल्याणाचाच विचार केला आणि आपल्या आयुष्य लोकांसाठीच जगले, त्यामुळे आज देखील इतक्या वर्षांनी नावारूपाने ते लोकांच्या स्मरणात आहेत. यालाच म्हणतात मरावे परी कीर्ती रुपे उरावे.
जन्माला आल्यानंतर फक्त इतरांची उणीदूनी काढत बसू नये. फक्त स्वतःचा फायदा आणि स्वतःचा स्वार्थ याच्या पलीकडेही आयुष्य जगले पाहिजे. जन्माला येऊन असे काहीतरी भव्य दिव्य करून जावे की आपल्या नसण्याने देखील लोकांचे डोळे आपल्या आठवणीत ओले झाले पाहिजे. हेच समर्थ रामदास या ऊक्ती मधून सांगतात.
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.