jivmarathi.blogspot.com
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे निबंध
Kelyane hot aahe re adhi kelechi pahije in hindi
या युतीवर आधारित एक छान मराठी निबंध आपल्यासाठी लिहिलेला आहे. जीवनामध्ये विद्यार्थ्यांना कर्माचे तसेच प्रयत्नांचे महत्त्व समजावे यासाठी केल्याने होत आहे रे किंवा प्रयत्न हाच परमेश्वर यांसारख्या विषयावर निबंध लिहायला सांगतात. या अनुषंगाने हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
|Kelyane hot aahe re adhi kelechi pahije
एखादे ध्येय ठरवल्यानंतर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कामाला लागणे अत्यंत आवश्यक आहे. आळस झटकून कामाला सुरुवात केली तर एक दिवस नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. प्रत्यक्ष प्रयत्न करत राहणे हाच ध्येयप्राप्तीचा सर्वात मोठा मार्ग आहे.
स्वामी समर्थ, आपल्या "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे "या वचनाद्वारे हेच आपल्याला सांगतात आणि नित्य कर्म करण्याची प्रेरणा देतात.
जसं जसे आयुष्य वाढत जाते तस तसे माणसाने कर्म करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. सतत कर्म करत राहिल्याने एक दिवस आपल्याला कर्म करत राहणे म्हणजे एक जबाबदारी न वाटता ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनून जाते .असा सतत प्रयत्न करणारे लोक एक दिवस देवच बनून जातात.
कष्ट करणे याला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे ,परंतु कष्ट करण्याला आजच्या या धावपळीच्या युगात बरेच लोक तयार नसतात .सर्वांना यश मिळवण्यासाठी सोयीचा आणि साधा मार्ग हवा आहे.
ज्या लोकांनी आळसामुळे कष्ट करण्याचे सोडून जीवन व्यतीत केले त्यांचे जीवन अत्यंत कष्टप्रद आणि यातनामय असल्याचे आपल्याला दैनंदिन जीवनात बघायला मिळते.
ध्येय प्राप्तीच्या मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे न थकता न आळस करता सतत कष्ट करत राहणे किंवा कर्म करत राहणे.
आपले ध्येय कोणतेही असू द्या शारीरिक, मानसिक ,सामाजिक परंतु त्यासाठी कष्ट करणे तर आवश्यक आहेच. ज्याला उत्तम शरीरयष्टी बनवायची आहे ,त्याने न थकता नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. शिस्तबद्ध पद्धतीने नियमितपणे व्यायाम केल्याने एक दिवस उत्कृष्ट शरीरयष्टी प्राप्त होणार यात अजिबात शंका नाही.
राजकीय क्षेत्रामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी झटणाऱ्या लोकांनी लोकांशी योग्य संपर्क वाढवणे गरजेचे आहे. लोकांच्या अपेक्षा गरजा जाणून घेऊन त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसाला राजकारणामध्ये यश मिळणार यात अजिबात शंका नाही. योग्यपणे सतत कर्म करत राहिला तर तो व्यक्ती उत्कृष्ट राजकारणी म्हणून नावारूपास येणार यात अजिबात शंका नाही.
म्हणून तुमचे ध्येय कोणतेही असो ,तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करायचे असो ,परंतु जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही, तेही नियमित स्वरूपात तोपर्यंत तुम्हाला यश मिळणे अशक्य आहे. असे प्रयत्न करण्यासाठी आधी प्रयत्नांना सुरुवात तरी करा .म्हणूनच श्री समर्थ रामदास आपल्याला सांगतात की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
तुम्हाला केल्याने होत आहे रे हा मराठी निबंध (kelyane Hot Ahe Re Nibandh Marathi) आवडला असेल तर नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका.
Kelyane hot aahe re adhi kelechi pahije writer
श्री समर्थ रामदास आपल्याला सांगतात की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.