माझी शाळा निबंध | माझी शाळा निबंध मराठी |majhi shala marathi nibandh

jivmarathi.blogspot.com 

माझी शाळा निबंध
 | माझी शाळा  निबंध मराठी
 | majhi shala marathi nibandh 

         | majhi shala marathi nibandh  माझ्या गावाचे नाव पिंपळनेर आहे. माझे प्राथमिक शिक्षण पिंपळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. तशी माझी शाळा खूप चांगली होती, परंतु माझ्या स्मरणात राहते ती म्हणजे माझे पाचवीपासून पुढे  शिक्षण ज्या शाळेत ती माझी शाळा म्हणजेच विद्यानंद हायस्कूल.

        विद्यानंद ही शाळा म्हणजे खरोखरच विद्येचा आनंद देणारी शाळा होय. माझ्या शाळेतील वातावरण अगदी प्रसन्न होते. मी ज्यावेळी या शाळेमध्ये शिकण्यासाठी गेलो तेव्हा शाळेचे बांधकाम अपूर्ण होते म्हणजे जुनी इमारत होती .परंतु नवीन इमारतीचे काम अजून चालू होते. पुढे दहावीपर्यंतचे शिक्षण मला याच शाळेमध्ये घ्यायचे होते.

| majhi shala marathi nibandh
 | majhi shala marathi nibandh 


|majhi shala nibandh 

         शाळेच्या आजूबाजूला बरीच मोठी झाडे होती. माझ्या वर्गाची जी खिडकी होती त्या खिडकीजवळच्या बाकावर बसत असे. त्या खिडकीच्या बाहेरच फुलांचे झाड होते. मला त्या फुल झाडाचे नाव तेव्हाही माहीत नव्हते ,परंतु बर्‍याच दिवसांनी मला कळले की त्यांना कागदी फुलांचे झाड म्हणतात अस . अर्थात या झाडाची नावे अजून वेगळे देखील असू शकतात परंतु मला तर कागदी फुलांचे झाड हेच नाव माहिती होते आणि आता आहे.

         शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक फक्त उच्च विद्याविभूषित नव्हते तर त्यांना विषय विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवायचा एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना कशी सोपी करून सांगायची यामध्ये देखील त्यांचा हातखंडा होता.

       ज्यावेळी मुसळे सर आम्हाला गणित शिकवत असत तेव्हा असे वाटायचे की गणितातील सर्व अंक माझ्याशी गप्पा मारत आहेत. भूमितीतील आणि बीजगणितातील हे विविध सूत्रे माझ्याबरोबर झिम्मा फुगडी खेळत आहेत . इतक्या आनंदमयी वातावरणामध्ये गणित विषय मी शिकलेलो आहे. त्यामुळे माझा आवडता विषय देखील गणितच बनला.

       आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी

   ही  कविता सरांनी ज्या  सुरेल चाली मध्ये शिकवली ती चाल आजही माझ्या कानामध्ये सतत गुणगुणत असल्याचा भास होतो. त्या कवितेतील नायकाने त्याचे दुःख त्या कवितेतून शिक्षकांनी अशा पद्धतीने आमच्या समोर मांडले की आमच्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या .

|majhi shala essay in marathi  

     
          इतिहासामधील लढाया सर इतके हुबेहूब वर्णन करीत असत की लढाई आमच्या डोळ्यासमोर घडते आहे असा भास होत असे. देशासाठी स्वराज्यासाठी आपल्या धर्मासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक थोर विद्वान नररत्नांची माहिती आम्हाला शिक्षक देत असत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साठी आम्हाला जगताप सर भाषण लिहून देत असत त्या भाषणांमध्ये शब्द ऐकल्याबरोबर बोलणाऱ्या सह ऐकणाऱ्या चे रक्त देखील तापू लागले नाही तर नवलच.

      शाळा म्हणजे आम्हाला फक्त शाळा नसून ज्ञानदान देणारे साक्षात सरस्वती माताच होती असे म्हणावेसे वाटते.  शाळेच्या परिसरात आम्ही भरपूर झाडे लावलेली आहेत. त्यामुळे झाडांना आता खूप सुंदर गुलाबाचे जाई-जुई मोगऱ्याचे पुढे येतात सकाळी आम्ही शाळेत यावे जातो तेव्हा या फुलांचा सुगंध शाळेच्या गेटमधून आत जातानाच मनाला मोहवून टाकतो.

       शाळेला प्रचंड मोठा गेट आहे. गेट वरती मोठ्या अक्षरांमध्ये शाळेचे नाव लिहिलेले आहे. गेट मधून आत गेल्यावर समोर शाळेचे तुम्ही प्रशस्त इमारत दिसते डाव्या बाजूला वाहनांसाठी असलेले पार्किंग तर उजव्या बाजूला नवीन इमारतीचे बांधकाम चालू असलेले दिसते.

      शाळेची इमारत जुनी वाटत असली तरी देखील फारच सुंदर दिसते. दरवर्षी या इमारतीला रंग दिला जातो. रंग देण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मत विचारले जाते ज्या रंगा बाबत जास्त मते येथील तो रंग शाळेला दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील शाळेविषयी विशेष आपुलकी वाटते.

           माझ्या शाळेच्या बाजूनेच एक नदी वाहत जात असे. ज्यावेळी वर्गात शांतता असते त्यावेळी नदीच्या वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज आम्हाला वर्गात स्पष्टपणे ऐकू येत असे.


        प्रिय मित्रांनो तुम्हाला हा माझी शाळा मराठी निबंध |majhi shala marathi nibandh कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर निबंध हवे असतील तर तेही कळवा. आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.

खालील निबंध अवश्य वाचा 

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने