कोरोना काळातील शाळेचे मनोगत|corona kalatil shala nibandh in Marathi

jivmarathi.blogspot.com

कोरोना काळातील शाळेचे मनोगत निबंध 

|corona kalatil shala nibandh in Marathi 


                 घंटेचा आवाज ऐकताच शाळेच्या मैदानावर भरण्यावर खेळणारी मुले प्रार्थनेसाठी जमायचे. प्रार्थना झाल्यानंतर दिवसभराच्या कामाला सुरुवात होत असे, पण आता ते दिवस गेले बरेच दिवस आठवडे आणि महिने गेले माझे सर्व अंगण ओसाड पडलेले आहे. आरोळ्या मारणारे ,खेळणारी, हसणारी, मुक्तपणे बागडणारी चिमुकली माझ्या प्रांगणात आता दिसत नाहीत.  कोरोना काळात शाळा बंद झाल्या आणि मानवाच्या आनंदाबरोबरच माझा आनंद देखील या कोरोना ने हिरावून नेला.

कोरोना काळातील शाळेचे मनोगत निबंध
कोरोना काळातील शाळेचे मनोगत निबंध 
|corona kalatil shala nibandh in Marathi



               आता मी माझ्या सर्व चिमुकल्यांच्या आठवणीत इथे एकटीच असते अगदी एकटी. सर्व शिक्षक शाळेत येतात पण त्यांच्या चेहऱ्यावरील उदासीनता मला जाणवते. घंटानाद लहान मुलांची धावपळ धार्मिक विधी मोठ्या आवाजात राष्ट्रगीत आणि प्रार्थनेचे मधुर सूर हा इतिहासच बनला आहे इथे एक शाळा होती या घटनेची नोंद घेताना इतिहास विषयाला देखील ओशाळल्यासारखे वाटेल.

कोरोना काळात बंद झालेल्या शाळेचे मनोगत


          किती सुंदर दिवस होते ते शाळा बागेसारखे फुललेली असायची सर्वत्र उत्साह संचारला होता शाळेची घंटा वाजताच अनेक विद्यार्थी गटागटाने शाळेत येताना दिसत होते. शाळेत लवकर येणारा विद्यार्थी शाळेत वेळ बघून घंटा वाजवत असे. घंटेचा आवाज ऐकताच विद्यार्थी आनंद भराने पाठीवर दप्तर घेऊन माझ्याकडे धावत येत असत. विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहर्‍याकडे बघून शिक्षकांचा चेहरा देखील आनंदाने भरून जात असे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचे आनंद चेहरे बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता. तो आनंद या कोरोना काळाने माझ्या कडून हिरावून घेतला आहे.

कोरोना काळातील शाळेचे मनोगत आत्मकथन

            शाळेच्या नित्यक्रम यापूर्वी सर्व विद्यार्थी व शिक्षक शाळेची स्वच्छता करत त्यामुळे आनंदी वातावरण निर्माण होत असे. आता शाळेला साफसफाईसाठी लोक शोधावे लागतात बेल वाजताच माझी सर्व मुले एका सरळ रेषेत उभी राहात आणि राष्ट्रगीत गात असत देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आदराप्रित्यर्थ अनेक देशभक्तीपर गीते हि गायली जात.    


हा निबंध खालील नावाने ही शोधतात-

 
कोरोना काळात बंद झालेल्या शाळेचे मनोगत आत्मकथन


Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने