jivmarathi.blogspot.com
आजच्या लेखात सर्व वाचकांसाठी निबंध कसा लिहावा याबद्दल सविस्तर माहिती पाहू.निबंध लेखणाचा सर्वात महत्वाचा उद्देश तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणे आहे.तथापि,बहुतेक वेळा, जेव्हा तुम्हाला निबंध लिहायचा असतो त्यावेळी आपण निबंधाचे पुस्तक घेतो आणि संपूर्ण निबंध लिहितो. यामुळे निबंध लेखनाचा खरा उद्देश बाजूला राहतो.
निबंध कसा लिहावा? |
Essay writing,
निबंध लेखन एक उत्कृष्ट कला आहे आणि कला म्हटले की तिला जतन करावे लागते. निबंध कला अवगत करण्यासाठी आपल्याला ज्या बाबी मदत करतात चला आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया.
निबंध लेखनाची पूर्वतयारी
- चांगला निबंध लिहिता यावा यासाठी खालील गोष्टींचा जाणीव पूर्वक सराव करा.
- वृत्तपत्रे आणि त्यातील पुरवणी यांचे नियमित वाचन करा.
- मासिकांचे आणि भरपूर पुस्तकांचे वाचन करा.
- सुंदर वाक्यांचा चारोळ्यांचा सुभाषिते सुविचार श्लोक यांचा संग्रह करा.
- नियमितपणे लेखनाचा सराव करा.
- तुम्ही बघितलेल्या दृश्यांची ,प्रसंगांची सहलीची वस्तूंची टिपणे लिहून ठेवा.
निबंध लेखनाबाबत महत्त्वाच्या सूचना.
कोणताही निबंध लिहिण्यास अगोदर खालील बाबींचा विचार करा.
- निबंध लेखनाचा विषय नीट वाचा.
- त्या विषयावर काही काळ चिंतन करा.
- निबंधाची भाषाशैली वाचनीय शुद्धलेखनाच्या नियमांना अनुसरून आकर्षक असावी.
- निबंधातील मुद्दे सूत्रबद्ध पद्धतीने मांडावेत.
- निबंध लेखनासाठी दिलेल्या मर्यादित ओळींचा विचार करूनच निबंधाची मांडणी करावी.
- निबंध लिहिताना हस्ताक्षर सुंदर नीटनेटके आणि सुवाच्च काढा.
- निबंधाचा विस्तार किती केला ? किंवा निबंध किती ओळी लिहितो ? यापेक्षा मर्यादित शब्दांमध्ये किती परिणामकारक लेखन केले आहे ,याला निबंधामध्ये जास्त महत्व असते . हे नेहमी लक्षात ठेवा.
- दिलेल्या सूचनांप्रमाणे निबंधाचा कल्पनाविस्तार करा.
निबंधाचे प्रकार
- वर्णनात्मक निबंध
- चरित्रात्मक निबंध
- कथनात्मक निबंध
- कल्पनाविलासात्मक निबंध
- सुभाषितपर निबंध
- चर्चात्मक निबंध
- चिंतनात्मक निबंध
वर्णनात्मक निबंध
आपण पाहिलेले एखादे स्थळ किंवा प्रसंग यांचे वर्णन करणे यालाच वर्णनात्मक निबंध म्हणतात. वर्णनात्मक निबंधामध्ये भाषा चित्रदर्शी असावी अशी अपेक्षा असते.
उदाहरणार्थ-
मी पाहिलेला समुद्र किनारा, रम्य पहाट निसर्गाच्या सानिध्यात ,आमची सहल ईत्यादी.
चरित्रात्मक निबंध
समाजासाठी किंवा देशासाठी अनेक व्यक्तींनी महान कार्य केलेले आहेत. अशा महान व्यक्तींविषयी समाजामध्ये आजही आदराची भावना आहे अशा व्यक्तींविषयी निबंध लिहिणे म्हणजे चरित्रात्मक निबंध लिहिणे होय.
कथनात्मक निबंध (मनोगत)
दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला आलेले अनुभव एखाद्या व्यक्तीविषयी असलेल्या भावना याबद्दल आपण ज्या विचार मांडतो त्या निबंध यांचा समावेश कथनात्मक निबंध मध्ये येतो. यामध्ये अजून बऱ्याचदा सजीव किंवा निर्जीव वस्तू आपल्याशी बोलत आहेत आणि त्यांचे मनोगत किंवा आत्मवृत्त आपल्याला सांगत आहेत अशी कल्पना करून निबंध लिहिले जातात त्या निबंध यांचाही यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ- घड्याळाचे मनोगत पडक्या मंदिराचे मनोगत, पडक्या वाड्याचे मनोगत, घर बोलू लागले तर इत्यादी प्रकारच्या निबंधांचा समावेश करता येईल.
कल्पनाविलासात्मक निबंध
ज्या गोष्टी घडणे शक्य नाही तसे घडले तर काय होईल अशी कल्पना करून जे निबंध लिहिले जातात त्यांना कल्पनाविलासात्मक निबंध म्हणतात.
उदाहरणार्थ-
सूर्य उगवला नाही तर..
मला पंख आले तर..
सुभाषितपर निबंध
प्रसिद्ध अशा सुविचार , वचनांवर , सुभाषितप अथवा म्हणी वर आधारित जे निबंध लिहिले जातात त्यांना सुभाषितपर निबंध म्हणतात.
उदाहरणार्थ-
गर्वाचे घर खाली
ग्रंथ हेच गुरु
देणाऱ्याने देत जावे..
चर्चात्मक आणि चिंतनात्मक निबंध
कोणत्याही व्यक्तीबद्दल ,घटनेबद्दल किंवा प्रवाहा बद्दल आपले मत मांडणे आपले विचार व्यक्त करणे , त्यातून आपला दृष्टिकोन सांगणे. यांनाच चिंतनात्मक किंवा चर्चात्मक निबंध असे म्हणतात.
मराठी निबंध विषय
|Marathi nibandh| Marathi essay topics
- माझी आई
- माझी शाळा
- माझा गाव
- माझे वडील
- माझी आजी
- माझे आजोबा
- माझा देश
- माझे गुरुजी
- माझा आवडता छंद
- माझा आवडता सण
- स्वातंत्र्य दिन
- राष्ट्रपिता महात्मा गांधी
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- राजश्री शाहू महाराज
- छत्रपती शिवाजी महाराज
- दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
- पंडित जवाहरलाल नेहरू
- माझा आवडता पक्षी
- माझा आवडता खेळ
- माझा आवडता प्राणी
- सूर्य उगवला नाही तर
- मला लॉटरी लागली तर
- मी सरपंच झालो तर
- मी मुख्यमंत्री झालो तर
- मी पंतप्रधान झालो तर
- मला पंख फुटले तर
- हिवाळा उन्हाळा पावसळा
- आमची सहल
- प्रदूषणाचा भस्मासुर
- दूरदर्शन शाप की वरदान
- मोबाईल शाप की वरदान
- आमची सहल
- एसटी स्टँड वरील एक तास
- पडक्या मंदिराचे आत्मवृत्त
- मी पाहिलेला अपघात
- म्हाताऱ्या बैलाचे आत्मवृत्त
- सुईचे आत्मवृत्त
- दप्तराचे आत्मवृत्त
- नदीचे आत्मवृत्त
- सौर ऊर्जा
- सावित्रीबाई फुले
- मला पडलेले स्वप्न
- वसंत ऋतु
- शाळेचा पहिला दिवस
- अंधश्रध्देचा शाप
- पावसाळ्यातील निसर्ग
- आमच्या गावची जत्रा
- महापुर
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.