jivmarathi.blogspot.com
प्रिय मित्रांनो अशा प्रकारच्या निबंध यांचा समावेश आत्मकथनात्मक निबंधांमध्ये होतो. यालाच तुम्ही मनोगत कल्पनात्मक निबंध यांमध्येही समाविष्ट करू शकता.
अशा प्रकारचा निबंध लिहिताना खालील मुद्यांचा वापर करता येऊ शकतो.
मुद्दे
- प्रसंग व वातावरण
- फुलांचे विचार
- फुलाच्या भावना
- फुलाने दिलेला संदेश
- निष्कर्ष व शेवट
- प्रसंग व वातावरण
संध्याकाळचे जेवण आटपून बाहेर ओट्यावर थोडासा निवांत बसलेलो होतो. उद्याच्या पुढेच मी माझ्या हाताने काही फुलझाडे लावलेली होती त्यामध्ये जाई जुई पारिजातक आणि मधुमालती यांचा समावेश होता. जेवण झाले होते म्हणून थोडासा मोकळ्या हवेत बसण्यासाठी ोटाच्या पायर्यांवर येऊन बसलेलो होतो.
डोक्यात काहीतरी विचार चालू होते तितक्यात एक मंद झुळूक आली आणि छान सुवास माझ्या नाकातून संपूर्ण शरीरभर पसरल्या सारखे वाटले. इतका मनमोहक सुगंध आला की संपूर्ण शरीर ताजेतवाने झाले. वास कुठून आला हे शोधत होतो तितक्यात आवाज आला. माझा सुगंध घेऊन छान वाटले का? आवाजाच्या दिशेने वर बघू लागलो तर अंगणातल्या झाडावर शुभ्र रंगाचे सुंदर फुल उमलले होते पण फूल बोलणार कसे असे वाटल्यामुळे मी इतरत्र बघू लागलो. त्यावेळी पुन्हा आवाज आला तुझ्या मनातील शंका काढून टाक आता तू माझ्याकडे बघितले ते जायचे फुलच मी बोलत आहे.
| fulache manogat nibandh marathi
फुलांचे विचार
मी आश्चर्याने फुलाकडे बघू लागलो. फुल अजून बोलू लागले. माझ्या सुगंधाने तुला जो आनंद मिळाला तसा आनंद इतरांनाही ज्या वेळ मिळतो , तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला देखील खूप आनंद होतो.
तुम्ही नवीन घर बांधले आणि नवीन घराच्या आनंदात माझे छोटेसे रोप अंगणात लावले सुरवातीचे काही काळ झाड वाढतच नव्हते त्यावेळी तुम्ही हे छोटेसे रोपटे काढून टाकणार होतात असे मला झाडाने सांगितले आहे परंतु बरे केले की तुम्ही थोडासा संयम राखला आणि फुले उमलण्याची वाट बघितली त्यामुळेच तर मग मी आता तुमच्याशी बोलू शकत आहे.
बऱ्याचदा आयुष्यामध्ये माणसाला संयम बाळगणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही संयम बाळगला म्हणून या वेलीवर माझा जन्म झाला नाहीतर माझा जन्म होण्याआधीच मृत्यू झाला असता.
माझ्यासाठी ला जाता याठिकाणी मधुमालतीची फुले देखील चांगल्या पद्धतीने उमलू लागलेली आहेत. मधुमालतीचा वेलीला फारसा सुगंधा येत नाही परंतु लाल गुलाबी पांढऱ्या रंगाची फुले ज्यावेळी एकत्रितपणे गुच्छा मध्ये फुलतात त्यावेळी माझे देखील सौंदर्य खुलते. आम्ही तर ठरवून टाकले आहे तू सुंदर सुंदर दृश्य निर्माण कर आणि मी छान सुगंध पसरवत जाईल. मधुमालती नही लगेच माझ्या या प्रस्तावाचा स्वीकार केला त्यामुळे आमची आता फारच चांगली गट्टी जमलेली आहे.
फुलाचे मनोगत निबंध मराठी
फुलाच्या भावना
कधीतरी तुझी आई माझ्या फुलांचा सुंदर गजरा बनवून केसात माळते. मग संपूर्ण घरामध्ये माझा सुगंध पसरवत असतो. खरोखरच दुसऱ्याला देण्यामध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्याकडून घेण्यामध्ये अजिबात नाही. प्रकारांमधून परमसुख माणसाला प्राप्त होत असते.
सकाळच्या प्रसन्न समय ज्यावेळी मंदिरांमध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लोक जात असतात त्यावेळी काहीजण या माझ्या वेलीवरची फुले तोडून घेऊन जातात आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतात.
आमच आयुष्य आणि आमचा आकार तसा फारच लहान आहे. परंतु आयुष्य आणि आकार मोठा असण्यापेक्षा आपले कर्तुत्व आणि आपले व्यक्तिमत्व उदात्त असले पाहिजे.
फुलाने दिलेला संदेश
तुम्ही आयुष्यामध्ये कधीही कोणाला तरी उपयोगी पडा इतरांना मदत करा आणि तुमचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक सुंदर बनवा. माणसाला आयुष्य एकदाच भेटते त्याचा सदुपयोग करा विनाकारण इतरांची निंदानालस्ती आणि तिरस्कार करण्यामध्ये ते वाया घालवू नका.ठीक आहे आता मी बोलून बोलून दमलो आता शांत बसतो. असे म्हणून फुल बोलायचे बंद झाले.
निष्कर्ष व शेवट
इवल्याशा फुलाने मला आयुष्य जगण्याचा एक चांगला मंत्र दिला होता. त्याचे ते शब्द माझ्या हृदयावर मी आज हि उमटवून घेतलेले आहे.
प्रिय मित्रांनो तुम्हाला हा मी फूल बोलते आहे किंवा फुलाचे मनोगत मराठी निबंध कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचे निबंध हवे असतील तर त्यांची नावे ही मला सांगा मी तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन.
वरती लिहिलेला मराठी निबंध फुलाचे मनोगत किंवा मी फूल बोलतो आहे किंवा फुलाच्या आत्मकथन इयत्ता तिसरी ,चौथी, पाचवी ,सहावी, सातवी ,आठवी साठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो.
या निबंधाचा लोक खालीलप्रमाणे हे शोध घेतात.
- |फुलाचे आत्मकथन
- | फुलाचे मनोगत
- | मी फुल बोलते आहे
- | फुलांची कैफियत
- |फुलाची आत्मकथा ,मराठी निबंध
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.