आमच्या गावची जत्रा मराठी निबंध। Aamchya gavachi jatra Marathi nibandh

jivmarathi.blogspot.com

आमच्या गावची जत्रा मराठी निबंध
। Aamchya gavachi jatra Marathi nibandh

आमच्या गावची जत्रा मराठी निबंध।


       आमच्या गावाचे नाव घुंगुर आहे. घुंगुर गाव डोंगरांमध्ये वसलेले आहे. ज्याप्रमाणे  आईच्या कुशीमध्ये बाळ प्रेमाने वेढलेले असते. अगदी त्याच प्रमाणे आमचे गाव डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेले आहे. आमच्या गावातल्या लोकांची सप्तशृंगी देवीवर खूपच श्रद्धा आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपठांपैकी सप्तशृंगी देवी हे अर्धे शक्तीपीठ समजले जाते.
      मंदिरात जाण्याचा रस्ता फार अवघड आणि अरुंद आहे रस्ता अवघड असला तरीदेखील मंदिरात जाण्याचे गावकरी कधीच चुकवत नाहीत.
       दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या देवीची मोठ्या उत्साहाने जत्रा भरते. जत्रेचे दिवस म्हणजे मोठा उत्सवच असतो. या काळामध्ये गावात सर्वांचे पैपाहुणे येतात. गावातील अनेक लोक नोकरी धंद्यामुळे गावा बाहेर पडलेले आहेत ते सर्व लोक जत्रेला न चुकता उपस्थित राहतात. या जत्रेत मुळे गावांमध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा गावकरी खूप आनंदाने पाहुणचार करतात.
      सप्तशृंगी देवीच्या जत्रेचा हा उत्सव सलग तीन दिवस चालू असतो. या तीन दिवसांसाठी सर्व जण मात्र खूप आधीपासूनच पूर्वतयारी करत असतात तीही अगदी धूमधडाक्यात. सगळीकडे चैतन्यमय वातावरण असते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो.
       जत्रेच्या काही दिवस आधी सगळे लोक एकत्र येतात देवळाच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर अगदी स्वच्छ करतात. मंदिराला नवीन रंग देतात आकर्षक रोषणाई केली जाते टाके लावले जातात फुलांच्या माळा लावून मंदिर अगदी सुंदर सजवले जाते. सप्तशृंगी माता भक्तांच्या नवसाला पावते त्यामुळे या जत्रेला खूप दूरवरच लोक देवीला नवस बोलण्यासाठी येतात. ज्यांचे नवस पूर्ण झाले ते लोक नवस फेडण्यासाठी येतात . म्हणून जत्रेच्या काळामध्ये मंदिराच्या परिसरात खूप गर्दी जमा होते.
        देवीच्या पूजेसाठी जे साहित्य लागते त्या पुजेच्या साहित्याची खूप मोठी दुकाने या काळामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असतात. प्रत्येक दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. खेळण्याच्या दुकानांमध्ये खेळणे अधिक आकर्षक पद्धतीने मांडलेले असतात. लहान मुले खेळणी बघून आकर्षित होतात व आपल्या आई-वडिलांना खेळणे घेण्यासाठी आग्रह करतात. सगळ्याच प्रकारच्या दुकानदारांची या तीन दिवसांमध्ये चांदीच असते असं समजा.
         साड्यांच्या दुकानावर स्त्रियांची गर्दी बघण्यासारखे असते. आपली साडी इतरांपेक्षा जास्तीत जास्त सुंदर दिसावे यासाठी स्त्रिया खूपच प्रयत्न करताना दिसतात. लाल हिरव्या निळ्या पिवळ्या अशा अनेक प्रकारच्या साड्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांच्या बाहेर नक्षी स्वरूपात अडकवलेल्या असतात. या साड्यांच्या नक्षी मुळे जत्रेची शोभा अधिकच खुलून दिसते. बाबा देखील आईसाठी दरवर्षी नवीन साडी घेतात. आत्या मावशी सगळ्यांसाठीच साड्या घेतल्या जातात. बाल गोपाल मंडळीसाठी देखील आकर्षक पद्धतीचे कपडे घेतात.
        भाविकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इतरही अनेक प्रकारची दुकाने असतात .छोट्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ देखील मांडलेले असतात. पाळण्यावर बसण्यासाठी मुलांची तर झुंबड उडालेली असते. मी देखील पाळण्यावर बसतो. मेरी गो राऊंड आणि विजेचा पाळणा हे म्हणजे माझे अत्यंत आवडते प्रकार आहेत.
       शेतकऱ्यांना व इतर व्यवसायिकांना ज्ञान मिळावे, नवीन तंत्रज्ञान समजावे यासाठी सुद्धा अनेक प्रकारची दालने असतात. जलसंधारण, कुटुंब व्यवस्था, स्त्री शिक्षण सामाजिक शिष्टाचार इत्यादी विषयी माहिती देणारे  दालन देखील उभारलेले असतात.
        सगळीकडे आनंदाचे वातावरण झिम्मा फुगडी खेळत असते . अशा वातावरणाचा आम्ही तीन दिवस मनसोक्त आनंद घेतो.  त्यानंतर परत येताना पुढच्या वर्षभरासाठी अनेक आठवणी सोबत घेऊन परत येतो.

हा निबंध लोक खालील नावानेही शोधतात .
  1. | मी पाहिलेली जत्रा 
  2. | mi pahileli jatra 
  3. | majhya gavachi jatra
  4. | माझ्या गावाची जत्रा  
  5. | मी पाहिलेली गावची जत्रा 
तुम्हाला खालील निबंध वाचायला नक्की आवडतील 

1 टिप्पण्या

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने