jivmarathi.blogspot.com
आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन मराठी निबंध
| School Annual Gathering Essay In Marathi
प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या-वाईट अशा खूप आठवणी असतात . त्यातील बऱ्याचशा आठवणी मनाच्या फार जवळच्या असतात ; आणि त्यामध्ये शाळेतील आठवणी तर पूर्ण आयुष्य लक्षात राहतात . आपल्या शाळेतील लहानपणा पासून तर मोठे होऊ पर्यंत चे शिक्षक , आपल्या मित्र-मैत्रिणी यांच्या सोबत शाळेत झालेले विविध कार्यक्रम , अनेक घटना , प्रसंग आपल्या मनात जसेच्यातसे कोरले जातात . मग ते शाळेचे शिक्षक असो शाळेची इमारत असून किंवा इतर काही असो , या सगळ्यांमध्येच मला आठवते ते म्हणजे दरवर्षी आमच्या शाळेत होणारे वार्षिक स्नेहसंमेलन.
आमच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन हा शाळेतील सर्वात आनंदायी आणि उस्ताहपूर्ण कार्यक्रम असतो जसा काही एखादा सनच असतो.आमच्या शाळेतील स्नेहसमेलन दरवर्षी आयोजित केले जाते, आणि आम्ही सर्व विद्यार्धी त्याची आतुरतेने वाट पाहत राहतो. स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी काही दिवस आधीच शाळेत एक वेगळेच वातावरण निर्माण होते. शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील इतर कर्मचारी यांची तयारी सुरु होते. प्रत्येकाला आपल्या भूमिकेची कल्पना असते, आणि सर्वजण एकत्र येऊन काम करतात.
विविध स्पर्धांचे आयोजन नीट पार पडावे यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार केलेले असतात; व त्यांना जबाबदारी वाटून दिलेली असते . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपली जबाबदारी अचूक पार पाडण्यासाठी धावपळ दिसून येते , कारण चांगली जबाबदारी पार पाडणाऱ्या ला गटाला संमेलनामध्ये शेवटी बक्षीस दिले जाते. पण बक्षीसापेक्षा काम करताना आलेला अनुभव आणि आनंद फार महत्त्वाचा वाटतो.
सांस्कृतिक स्पर्धा चालू असतानाच्या त्या आठवणी ती मजा अजूनपण मला आठवते. स्नेहसंमेलन तर आहेच पण अजून सांस्कृतिक स्पर्धा जसे नाटक स्पर्धा ,गायन स्पर्धा , भाषण स्पर्धा यामध्ये विविध विद्यार्थी खूप तयारी करून सादरीकरण करतात . नाटक स्पर्धेत तर बऱ्याचदा काहीजण संवादच विसरून जातात . तेव्हा खूप मजा येते ;कारण बाकीचे विद्यार्थी त्याला 'बोल ना ,बोल ना ' 'म्हणून सारखं सांगत असतात पण तो मात्र गप्प बसतो.
स्नेहसंमेलनाच्या दिवशी शाळा खूप आकर्षक दिसते.शाळेची इमारत विविध रंगांच्या सजावटीने नटलेली असते. स्स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात , यात नृत्य , नाट्य, गायन , भाषण आणि क्रीडास्पर्धा यांचा समावेश असतो. या कार्यक्रमात विद्यार्थांची सहभाग घेण्याची मोठी उत्सुकता असते. विद्यार्थांनी तयार केलेल्या नाटकांनी प्रेक्षकांना हसवले व भाविवशक केले.
आमच्या शाळेतील स्नेहसंमेलनाच्या दिवशी आलेले प्रमुख पाहुणे त्यांचे स्वागत आमच्या शाळेतील विद्यार्थी एका स्वागत गीताने करतात. त्यानंतर आलेले प्रमुख पाहुणे थोर पुरुष आणि स्त्रिया यांच्या फोटोनची पूजा करतात . व स्नेहसंमेलनाचे उत्घाटन करतात . आणि त्यानंतर स्नेहसंमेलनाला सुरवात होते.
धन्यवाद
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.