jivmarathi.blogspot.com
|Marathi bodh katha |moral stories for kids |मराठी बोधकथा
आपल्या मुलांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण रुजावेत ज्यामुळे त्यांचे जीवन आनंददायी आणि चांगले होईल असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी अनेक चांगल्या पुस्तकांची तसेच बोधकथांची आवश्यकता असते अशाच मराठी बोधकथा Marathi bodh katha |moral stories for kids आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
|मराठी बोधकथा
( |Marathi bodh katha no.1)
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
एक होती म्हातारी. ती निघाली लेकीच्या घरी. लेकीचे गाव होते खूप दूर गावाची वाट जंगलातून
जात होती. काठी टेकत टेकत म्हातारी एकटीच चालली होती. चालता चालता जंगल आलं. जंगलात
भेटला एक लांडगा.
तो म्हणाला, “म्हातारे, म्हातारे खाऊ का तुला?"
म्हातारी म्हणाली, “मी अशी रोडकी, मला खाऊन तुला काय मिळणार? मी लेकीकडे जाईन
महिनाभर राहीन, तूप-रोटी खाईन, जाडजूड होईन, मग मला खा.”
लांडगा म्हणाला, “ठीक आहे. पण मला फसवू नकोस."
म्हातारी हळू हळू पुढे निघाली. पुढे तिला भेटला वाघ. तो म्हणाला, “म्हातारे, म्हातारे खाऊ का
तुला?”
म्हातारी म्हणाली, “मी अशी रोडकी, मला खाऊन तुला काय मिळणार? मी लेकीकडे जाईन,
महिनाभर राहीन, तूप-रोटी खाईन, जाडजूड होईन, मग मला खा.”
वाघ म्हणाला, “ठीक आहे. पण मला फसवू नकोस."
काठी टेकवत म्हातारी चालत राहिली. लेकीचे गाव आले. म्हातारी लेकीच्या घरी पोहोचली.
महिनाभर राहिली. लेकीने तूप-रोटी खाऊ घातली. म्हातारी जाङ-जूड झाली. ती परत आपल्या घरी
निघाली. निघताना ती लेकीला म्हणाली, “बाई गं, मी पुन्हा तुला दिसणार नाही. जंगलात वाघ आणि
लांडगा माझी वाट बघत असतील. ते मला खाऊन टाकतील.”
ते ऐकून लेकीला खूप वाईट वाटले. तिने विचार केला, आता काय करावे ? तिला एक युक्ती
सुचली. तिने घरातला एक मोठा भोपळा काढला. ती म्हणाली, “आई. आई तू या भोपळ्यात बस. भोपळा
तुला घेऊन जाईल. मग वाघ आणि लांडगा तुला खाणार नाहीत.'
म्हातारी बसली भोपळ्यात. भोपळा निघाला टुणुक टुणुक. वाटेत भेटला वाघोबा. तो म्हणाला,
“भोपळ्या, तू म्हातारीला पाहिलेस का ?" भोपळ्यातून म्हातारी म्हणाली, “म्हातारी बितारी मला नाही
ठाऊक. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक.
भोपळा पळू लागला. त्याच्या मागे वाघही पळू लागला.भोपळा पळू लागला. त्याच्या मागे वाघही पळू लागला.
पुढे भेटला लांडगा. त्याने भोपळ्यातून पळणाऱ्या म्हातारीला ओळखले. पळत पळत जाऊन त्याने
भोपळा पकडला. लांडग्याने म्हातारीला भोपळ्यातून बाहेर काढले. तो म्हणाला, “म्हातारे, मला
फसवतेस काय? थांब आता खातोच तुला.” तेवढ्यात वाघ तेथे आला. तो लांडग्याला म्हणाला,
"म्हातारीला मी खाणार !” लांडगा म्हणाला, “नाही नाही. मी भोपळा पकडला. मीच म्हातारीला
खाणार !” वाघ म्हणाला, “नाही, नाही मीच खाणार"
दोघांचे लागले भांडण. तेवढ्यात त्यांना चुकवून म्हातारी पटकन् भोपळ्यात बसली आणि
भोपळ्याला म्हणाली, “चल रे भोपळ्या टुणुक टुणुक !”
म्हातारी आपल्या घरी सुखरूप पोहोचली.
|मराठी बोधकथा
( |Marathi bodh katha no.2)
ससा आणि कासव
एकदा एक ससा जंगलात इकडून तिकडे उड्या मारत होता. त्याला एक कासव दिसले. ते डुलत डुलत हळूहळू चालत होते. ससा म्हणाला, “किती रे हळू चालतोस तू? मी बघ कसा वेगात पळू शकतो."
कासव म्हणाले, “बढाई मारू नकोस, त्यापेक्षा पळण्याची शर्यतच आपण लावू.” सशाला हसू आले.
तो म्हणाला, “तू म्हणतोस तर लावूया शर्यत, पण मी जिंकणार हे नक्की.” कासव म्हणाले, “ठीक आहे.
नदीपर्यंत पळत जाऊया.”
शर्यत सुरू झाली. ससा टणाटण उड्या मारत पळू लागला. बराच पुढे गेला. त्याला गाजराचे शेत
दिसले. शेतकऱ्याने गाजरे काढून ठेवली होती. ताजी ताजी गाजरे पाहून सशाच्या तोंडाला पाणी सुटले.
त्याने मागे वळून पाहिले. कासव दिसतही नव्हते. म्हणून त्याने मनसोक्त गाजरे खाल्ली. तो पुढे चालला.
एवढ्यात त्याला मुळा आणि भाजीपाल्याचे शेत दिसले. पांढरे शुभ्र मुळे नि हिरवागार भाजीपाला
खायचा त्याला मोह झाला. त्याने मुळे नि भाजीपालाही खाल्ला. त्याचे पोट टम्म भरले. त्याला आता
डुलकी येऊ लागली.त्याने मागे वळून अंदाज घेतला. कासव कोठेच दिसत नव्हते. त्याला वाटले, कासव डुलत डुलत
सावकाश येणार तोपर्यंत आपण एक डुलकी काढूया. ससा झोपी गेला.
कासव सतत चालतच होते. नदीजवळ पोहोचायचे एवढेच त्याच्या लक्षात होते आणि शेवटी ते
नदीजवळ पोहोचले.
इकडे ससा जागा झाला. कासव काही मागे दिसत नव्हते. तो नदीकडे पळत सुटला. नदीजवळ पोहोचला. पाहतो तर काय ! त्याच्या आधीच कासव तेथे पोहोचले होते. सशाला पाहून कासव म्हणाले,
“पाहिलेस, मी हळूहळू चालतो पण कोठेही न थांबता चालतो. त्यामुळे तर मी शर्यत जिंकू शकलो."
अजुन काही यांसारख्या मनोरंजक कथा -
१)चिमणी आणि कावळा
२)कोल्हा आणि उंट
३)तहानलेला कावळा
४) मुंगी आणि कबुतर
५)दोन शेळ्या
६)वानराची शेपटी
७)गाढवाची फजिती
८)टोपीवाला
९)सिंह आणि उंदीर
१०) सिंह आणि कोल्हा
- Simple moral stories in marathi
- Marathi bodhkatha
- Simple bodhkatha in 5 lines
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.