स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २ | INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI 2

jivmarathi.blogspot.com

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी | INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI |





सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 मित्रांनो, १५ ऑगस्ट हा भारताचा सन्मान आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला भारत देश अनेक वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 

      आपल्या भारताला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले.


महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपतराय अशा अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. 

          त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आज आपण आपल्या देशात मोकळा श्वास घेत आहोत.

       स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने शेती, विज्ञान-तंत्रज्ञान, साहित्य, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताचा स्वतःचा अण्वस्त्र साठा आहे. 

        भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. तरीही आज भारत महागाई, भ्रष्टाचार, गरिबी अशा समस्यांना तोंड देत आहे. या समस्यांचे उच्चाटन झाल्याशिवाय देश समृद्ध आणि संपन्न होणार नाही

   चला तर मग आपण सर्वांनी मिळून आपला भारत देश हा जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. 
शेवटी मी सांगू इच्छितो, 

तिरंगा आमुचा ध्वज, 
उंच उंच फडकवू…
प्राणपणाने लढून आम्ही,
शान याची वाढवू…


धन्यवाद!
भारत माता की जय ! वंदे मातरम !




People also search as

15 ऑगस्ट भाषण मराठी शायरी
15 ऑगस्ट भाषण 2023
15 ऑगस्ट 2023 कितवा आहे
15 ऑगस्ट भाषण हिंदी
15 ऑगस्ट भाषण हिंदी 2023
15 ऑगस्ट भाषण १० ओळी

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने