स्वातंत्र्य दिन भाषण मराठी१ | INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI 1|

jivmarathi.blogspot.com


स्वातंत्र्य दिन भाषण मराठी | INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI |



15 August speech in Marathi|स्वतंत्र दिन भाषण 



स्वातंत्र्याची ध्वजा फडकते.
सूर्य तळपतो प्रगतीचा.
भारत भूमीच्या पराक्रमाला
मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा.

सन्माननीय व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा दिवस.


         15 ऑगस्ट 1947 ... होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.
आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मानाचा दिवस आहे.अशा या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.
          १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी भारत सुमारे दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. इंग्रजांनी दिलेली असमान वागणूक, भेदभाव आणि जाचक नियमांमुळे स्वातंत्र्यदिनी अनेक शूर वीरांनी भारतीयांच्या मनात एकतेची भावना निर्माण करण्यास सुरुवात केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले.
       भारतीय लोकांच्या, महापुरुषांच्या, क्रांतिकारकांच्या अथक परिश्रमामुळे आणि आत्मत्यागामुळे भारतीयांच्या जीवनात स्वातंत्र्याचा आनंदी दिवस उगवला, म्हणून हा दिवस सर्व भारतीयांसाठी अतिशय आनंददायी आणि अविस्मरणीय आहे.
              या कारणांमुळे देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांनी ठिकठिकाणी स्वातंत्र्याचा लढा सुरू केला. यामध्ये लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
    लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेत स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.
      भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून , ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.
देशातील प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून सर्व, आपापसातील वैर सोडून प्रत्येक भारतीय देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. व जगामध्ये देश महासत्ता म्हणून उदयास येईल.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो 

जय हिंद जय भारत


People also search as

  • 15 ऑगस्ट भाषण मराठी शायरी
  • 15 ऑगस्ट भाषण 2023
  • 15 ऑगस्ट 2023 कितवा आहे
  • 15 ऑगस्ट भाषण हिंदी
  • 15 ऑगस्ट भाषण हिंदी 2023
  • 15 ऑगस्ट भाषण १० ओळी






    
    


Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने