पावसाचे वर्णन |pavsala Nibandh| pavasala nibandh in Marathi

jivmarathi.blogspot.com

पावसाचे वर्णन 
|pavsala Nibandh| pavasala nibandh in Marathi 

पावसाचे वर्णन |pavsala Nibandh| pavasala nibandh in Marathi
पावसाचे वर्णन |pavsala Nibandh| pavasala nibandh in Marathi 


           पडघम या चामडी वादयावर काठी (टिपरी) पडली की जसा 'तडम् तड्तड् तडम्' असा आवाज येतो,तसा कौलांवर पावसाचे टपोरे थेंब पडल्यावर तडम् तड्तड् तडम् आवाज येतो.ढग गडगडतात तेव्हा जणू म्हातारी हरभरे भरडते तसा आवाज होतो. पावसाच्या थेंबाबरोबर कडम कडम् असा आवाज करीत वीज कोसळते.

         पावसाचा थेंब जेव्हा साठलेल्या पाण्यावर पडतो तेव्हा थरथर तरंग उमटतो. जणू आनंदाचे तरंग अंगावर उठल्यामुळे सगळे अंगण नाचायला लागले आहे.

       झाडांवर पावसाच्या धारा पडत आहेत तसेच मधूनच वारा शिरल्यामुळे पाने सळसळत आहेत. जणू जमिनीच्या कणाकणात (नसानसांत) सर्व आवाजांचे संगीत जुळून आले आहे.

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने