मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning part 1

jivmarathi.blogspot.com

|मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ
|Marathi thoughts with meaning part 1

|मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ |Marathi thoughts with meaning part 1
|मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ
|Marathi thoughts with meaning 



सुविचार क्रमांक १

निंदकाचे घर असावे शेजारी.


    निंदा करणारे व्यक्ती सतत आपले दोष दाखवत असतात, आणि आपला तिरस्कार करत असते परंतु याकडे आपण एका चांगल्या नजरेने बघायला हवे. निंदक आपल्याला फुकटातच आपल्या चुका आणि आपल्या कमजोरी दाखवून देत असतो आपण त्यावर विचार करून त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. निंदा करणाऱ्याला आपल्या चांगल्या कृती मधून उत्तर द्यायला हवे.
    आपली निंदा करणारा हा आपल्यासाठी साबणाचे काम करत असतो. ज्याप्रमाणे साबण आपल्या अंगावरील मळ काढून टाकतो त्या पद्धतीने निंदा करणाऱ्यांमुळे आपल्या वागण्यातील आपल्या चारित्र्यातील आणि आपल्या विचारांमधील मळ निघून जातो म्हणूनच म्हणतात निंदकाचे घरचे  असावे शेजारी.

सुविचार क्रमांक २

शब्दांच्या आवाजापेक्षा कष्टाचा आवाज मोठा असतो.


   फक्त तोंडाने बडबड करण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपण एखादी गोष्ट दाखवून दिली तर ती अधिक परिणामकारक असते. आपण जसे बोलतो तसे वागतो का याचा लोक बारकाईने अभ्यास करत असतात.
    त्यामुळे फक्त बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपला हेतू लोकांसमोर स्पष्ट झाला पाहिजे. ज्यावेळी आपला हेतू कृतीतून दिसू लागतो त्यावेळेस शब्दांचा वापर करून आपले विचार दुसऱ्यांना सांगण्याची गरज राहत नाही.

सुविचार क्रमांक ३

विद्या विनयन शोभते.


  ज्ञानी माणसाच्या अंगी विनयशीलता आणि नम्रता असणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर त्याच्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. ज्ञान मिळवल्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात अंतर्बाह्य बदल होतो.
 जर भरपूर ज्ञान मिळवून देखील आपल्या वागण्यात आणि वर्तनात बदल झाला नाही तर ज्ञान भरपूर असले तरी देखील आपल्याला आदर मिळत नाही किंवा आपण लोकांच्या मनात मनाचे स्थान मिळवू शकत नाही म्हणूनच विद्यावान माणसाने सदैव विनयशीलतेने वागायला हवे.


विनंती

मित्रांनो तुम्हाला वरील मराठी सुविचार आणि त्यांचे अर्थ |Marathi thoughts with meaning कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला अजून कोणत्याही सुविचाराचे अर्थ व स्पष्टीकरण अधिक विस्ताराने हवे असतील तर तेही कळवा .आम्ही आपल्याला नक्की मदत करू खूप खूप धन्यवाद.

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने