मोबाईलचे मनोगत निबंध मराठी | mobile che manogat |

           Mobile che manogat nibandh,.                            
  नमस्कार मित्रांनो मी मोबाईल बोलत आहे. आज मला तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करायचे आहे. बरेच दिवस झाले मी ऐकतो आहे की मोबाईल मुळे तरुण पिढी वाईट मार्गाला लागली ,मोबाईलमुळे तरुणपिढी आपला रस्ता चुकली आहे. अरे वा! म्हणजे चुका तुमच्या आणि त्याच सर्व खापर मात्र माझ्या डोक्यावर फोडताय तुम्ही.
      



मोबाईलचे मनोगत निबंध मराठी | mobile che manogat |
मोबाईलचे मनोगत निबंध मराठी | mobile che manogat |

 

     माझ्या नावाने तुम्ही आरडाओरडा करतात परंतु मी कधी सांगितलं की तुम्ही तुमचे कामधंदे सोडून माझ्याकडे बघत बसा असं. माझ्यामध्ये संपूर्ण जगाचे ज्ञान तुम्हाला मिळू शकतो त्या पद्धतीने तुम्हाला ज्ञानापासून दूर नेणाऱ्या आणि तुमचा वेळ वाया घालवणार या मनोरंजनाच्या गोष्टीदेखल माझ्यामुळे तुम्हाला बघायला मिळू शकतात.
     असं असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे कि मी स्वतःहून तुम्हाला कोणतीही गोष्ट करून देऊ शकत नाही तुम्हीच मला आदेश देऊन माझ्याकडून हवं ते काम करून घेतात मग मला सांगा माझ्यामुळे तुमचं नुकसान कसं झालं तुम्हीच तुमच्या नुकसानाला किंवा फायद्याला जबाबदार आहात. उगाच माझ्या नावाने ओरडत बसू नका.
       ह्या उलट असा विचार करा कि मोबाईल मुळे परगावी असलेल्या तुमच्या प्रियजनांना तुम्ही कधीही फोन लावून त्यांच्याशी गप्पा मारू शकता. पूर्वीच्या काळी संदेश देण्यासाठी पत्र लिहीत असत आणि यासाठी खूप वेळ जायचा आता मात्र तुम्हाला कोणालाही संदेश द्यायचा असला की माझ्या मदतीने तुम्ही अगदी काही सेकंदात तुमचा संदेश सगळीकडे पोहोचवू शकतात.
       माझ्यामुळेच संपूर्ण जग हे छोटसं खेड बनून गेलेल आहे. जगातील कुठलीही वास्तु किंवा गोष्ट अगदी काही क्षणात तुम्ही माझ्या पटलावर बघू शकता. व्हाट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यासारख्या सोशल माध्यमातून संपूर्ण जगातून तुम्ही मित्र मैत्रिणी जोडू शकतात.
     
      मोबाईलच्या माध्यमांनी तर अनेक हुशार लोकांनी स्वतःचे ऑनलाइन बिजनेस देखील सुरू केलेले आहेत व स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. मोबाईलचा जर तुम्ही योग्य रीतीने वापर केला तर कमी श्रमामध्ये तुम्ही मोठे आर्थिक उत्पन्न मिळवू शकता.
     
      इतका सगळं मी सांगितलं हे फक्त माझ्या मनोगताचा काही भागच आहे अजून बरंच काही मला बोलता येईल परंतु वेळेअभावी मी आता जास्त बोलत नाही तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की पुन्हा तुमच्या चुकीसाठी मला जबाबदार धरू नका. माझं बोलणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

       Mobile che manogat in Marathi


Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने