स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत | swatantrya sainikache manogat

jivmarathi.blogspot.com

स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत मराठी निबंध
| swatantra sainik manogat essay in marathi 

|स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत
| swatantrya  sainikache manogat 



"गल्लोगल्ली नंगा करीत आहे दंगा
 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फक्त
 फडफडतो झेंडा 
तुम्हीच सांगा मित्रांनो 
 फडफडतो का तडफडतो तिरंगा."

             काय कुठून आवाज येतोय बघताय ? कोण बोलतोय ते बघताय ? इकडं-इकडं  मी एक स्वातंत्र्य सैनिक   बोलतोय . मी कोण  ? मी आहे या भारत मातेचा हरलेला बाळ. मी आहे एका बहिणीच्या राखीचा अधिकारी. मी आहे एका वृद्ध मातापित्याची  ताकद आणि एका लहान भावाची मालकीची मिळकत .

              बरेच दिवस तुमच्याशी बोलायचं म्हणतोय पण वेळच मिळत नव्हता आणि माझ ऐकण्यासाठी तुमच्याकडे वेळ तरी आहे कुठे ? पण निर्भया सारखी प्रकरणे आणि दररोज कानावर येणाऱ्या गुन्हेगारी संबंधित  बातम्या ऐकून मनाचा संयम ढळला आणि वाणीने  मनाला न जुमानता टाहो फोडला  . या बातम्या ऐकून वाटते ," याच साठी का  केला होता अट्टाहास."

        आजच्या जगात माणूस शिक्षित झाला यात शंका नाही , पण कुठेतरी संस्कार विसरू लागलाय . संवादाची साधने वाढली पण संवाद कमी झाला . इमारती उंच झाल्या पण  माणुसकीची उंची  कमी झाली . मला माहित आहे की आताच्या जगात वाईटच घडते असे नाही.  या ठिकाणी कलेची कदर करणारे अनेक रसिक आहेत . यशाची नवनवीन व्याख्या करणारे अनेक नवरत्ने ही या ठिकाणी आहेत . देशाने  बौद्धिक , भावनिक व यांत्रिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे.  पण कुठेतरी काहीतरी चुकत आहे.

       सीमेवर लढताना मनात एकच विचार होता. पारतंत्र्याच्या बेड्यांनी बंदिस्त भारत मातेला मोकळे करून स्वातंत्र्याची सुवर्ण स्वप्ने पाहावीत आणि पाहिलीतही . काही सिद्ध केले ,तर काही विरुन गेलेत . लढताना नजरेसमोर येत असे देशातला सामान्य माणूस. नजरेसमोर येत असे चुलीवर भाकरी करणाऱ्या आयाबहिणी , आणि त्या भाजणाऱ्या भाकरीचा खमंग वास. 

               ज्या गावात जन्मलो वाढलो खेळलं त्या गावातील माती , त्या मातीतील नाती आणि  त्या नात्यामुळे जीवाला  मिळालेली विश्रांती . अखंड जिवाच्या आकांताने मनात बाळगलेली स्वप्ने आणि त्या स्वप्नांसाठी केलेली रक्तरंजित क्रांती  ही  केवळ भ्रांतीच   होती असे वाटू लागले आहे. पण तुमच्यासारख्या बालकांकडून अजूनही आमच्या अपेक्षा आहेत .सध्याच्या युगात आपल्या प्रगतीशील देशात अनेक समस्या आहेत.  तसेच जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये टिकून राहायचं असेल तर स्वतः तत्पर राहणे अत्यंत निकडीचे आहे . त्यासाठी तुम्ही सर्व बालकांनी म्हणजेच उद्याच्या नागरिकांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे .

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने