jivmarathi.blogspot.com
|कावळा पक्षी माहिती मराठी
kavalyache manogat marathi essay |
| कावळा बोलू लागला तर
किंवा
|कावळ्याचे आत्मकथन मराठी निबंध .
| crow marathi essay, सर्वांना नमस्कार मी कावळा बोलतो आहे. आज माझे मनोगत तुमच्यासमोर व्यक्त करायचे ठरवूनच मी घरट्यातून बाहेर निघालो. माझा रंग काळा कुळकुळीत आहे. माझा काळा रंग तुम्हाला आवडत नसेल परंतु मला माझ्या रंगाचा खूप अभिमान आहे.
तुम्ही लहानपणापासून चिऊ काऊची गाणे आणि गोष्टी ऐकतच मोठे होतात. बऱ्याच गोष्टींमध्ये किंवा गाण्यांमध्ये कावळा कसा वेडा आहे असे दाखवले जाते परंतु ही गोष्ट ही तुम्ही नक्की ऐकले असेल ती म्हणजे तहानलेला कावळा .या गोष्टींमध्ये माठातील पाणी कावळा कसा पितो हे सगळ्यांना माहीत आहे.
मी काळा असलो तरीदेखील माझ्या इतका हुशार पक्षी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. माझ्या आगमनाला देखील अत्यंत महत्त्व आहे. मी एखाद्या घराच्या छतावर बसून काव काव केले तर घरी पाहुणे येणार असे म्हटले जाते. म्हणजे तसे बघितले तर मी तुम्हाला पूर्वसूचना देणारा तुमचा मित्रच नाही का ?
मला म्हणजे कावळ्याला एकाक्ष असेदेखील म्हणतात. मी एखाद्या ठिकाणी बसलेलो असलो तर देखील माझे चारही बाजूंना लक्ष असते. मी ऊडून जाण्यासाठी अगदी तत्पर असतो. माझ्या या तत्परतेमुळे मला पकडणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे.
कावळे कधीही स्वतःची अंडी स्वतः उबवत नाहीत. कावळे त्यांची अंडी हळूच कोकिळ पक्षाच्या घरट्यामध्ये ठेवतात. बिचार्या कोकीळ पक्ष्याला समजतही नाही. इतके आम्ही लबाडही असतो. हे मी मान्य करतो.
माझा काळा रंग मला सर्व पक्ष्यांपैकी निराळा ठरवतो. एक दिवस मी ठरवले की मला गोरे व्हायचे आहे म्हणून एक साबण घेतला आणि नदीवर अंग धुवायला निघून गेलो. भरपुर साबण लावून चांगले अंग घासले पण माझा रंग बदलणे ऐवजी अजूनच चकचकीत काळा झाला. मनात विचार आला अरे पंढरपूरचा विठ्ठल भगवान देखील काळाच आहे. लोकांनाही आपले केस काळे असलेलेच आवडतात. मग मी का माझ्या रंगाची लाज बाळगू? तेव्हापासून रंगाचा विचार करणेच सोडून दिले व मला प्रचंड आनंद मिळाला.
कावळा शिवणे
कावळा शिवला तर काय होते?
शकुनशास्त्राच्या अभ्यासानुसार कावळे दिसणे हे एक प्रकारचे लक्षण आहे,, कावळे दिसणे म्हणजे तुमची एखादी मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार याचा संकेत आहे. घराच्या छतावर किंवा घराच्या मुख्य गेटवर बसून कावळा ओरडत असेल तर घरी पाहुणे येणार याचा संकेत असतो.
काय होते कावळा एका महिलेच्या डोक्यावर मारतो?
ज्यावेळी एखाद्या महिलेच्या डोक्यावर कावळा बसतो किंवा मारतो तर त्या स्त्रीच्या नवऱ्यावर एखादे संकट येण्याची शक्यता असते.
कावळा समानार्थी शब्द
काक, एकाक्ष, वायस
कावळा या शब्दाचा यमक शब्द कोणता?
आवळा, बावळा, मावळा
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.